नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीमधील लीग्रँड कंपनीमध्ये (Legrand India Private Limited) कंपनी व्यवस्थापन व नाशिक वर्कर्स युनियन संलग्न संघटना यांच्यात सकारात्मक चर्चा होऊन वेतनवाढ करार करण्यात आला. सदर पगारवाढ १ जुलै २०१९ ते ३० जून २०२२ कालावधी करता असेल.
वेतनवाढ करार पुढील प्रमाणे :
- करार तीन वर्षासाठी (१ जुलै २०१९ ते ३० जून २०२२) रु.११,५५०/- इतकी पगार वाढ
- दर वर्षी २० टक्के बोनस (सुमारे ७६ हजार रुपये) पूर्ण बेसिक डीए वर दिला जाणार
- कामगारांना रु.7/- पर पॉईंट या दराने महागाई भत्ता
- ग्रॅज्युटी मध्ये दुप्पट वाढ
- सेवानिवृत्तीनंतरही ७५ वर्षापर्यंत कामगारांच्या कुटुंबाची मेडिक्लेम सुविधा सुरू राहणार
- कामगारांना टर्म लाइफ इन्शुरन्स योजना लागू करण्यात आली असून कामगारांना वार्षिक वेतनाच्या तीन पट रक्कम मिळणार
- वेतनवाढ करार फरक रक्कम मिळणार
यावेळी करारावर सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष डॉ.डी.एल कराड, नाशिक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस सिताराम ठोंबरे, उपाध्यक्ष तुकाराम सोनजे, कमिटी मेंबर - सोपान पवार, खुशाल चौधरी, संजीव अहिरराव, वेणीलाल पवार, किशोर रोकडे तर कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट नितीन महाजन, जनरल मॅनेजर अभय खरे, एच आर नितीन शिंदे आदींनी सह्या केल्या आहेत.
सर्व कामगारांना प्रोत्साहन भत्ता
लॉकडाऊन काळात ज्या कामगारांनी काम केले आहे. त्या कामगारांना फेब्रुवारी महिन्यातील पगाराच्या ३५ टक्के वेतन देण्यात आले आहे. हे वेतन कायम कामगारांसह, हंगामी कामगार, सिक्युरिटी कामगारांनाही देत कंपनीने इतर कारखान्यांसमोर आदर्श उभा केला आहे.
"नाशिक वर्कर्स युनियनने वेगवेगळ्या कारखान्यात दहा यशस्वी करार केले आहे. उद्योगांनी कामगारांना पेन्शन द्यावी यासाठी प्रयत्न सुरू असून, अनेक उद्योजक यासाठी सकारात्मक दिसून येत आहेत."
राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष,सिटू
- Salary increase of Rs.11,550 / - for three years contract (1st July 2019 to 30th June 2022)
- 20% bonus every year (around Rs. 76,000) will be given on full basic DA day
- Dearness allowance at the rate of Rs.7/- per point to the workers
- Doubling in graduation
- Even after retirement, the Mediclaim facility of the worker's family will continue for 75 years
- A term life insurance scheme has been introduced for the workers and the workers will get three times the annual salary
- The incremental contract will get the difference amount
"Nashik Workers Union has signed 10 successful agreements in different factories. Efforts are being made by the industry to provide pensions to the workers and many entrepreneurs are looking positive for this."