बॉश कंपनी ने कामगारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे यानुसार कोरोना विषाणूमुळे कोणत्याही कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कर्मचार्यांना सरासरी ७० लाख रुपयांचे विमा संरक्षण त्याचबरोबर कोविड -१९ मधील कामगारांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना तीन वर्षांचा आरोग्य विमा देखील दिला जाईल असे वृत्त हॅलो महाराष्ट्र वृत्तसंस्थेने दिले आहे.
बॉश यांनी सांगितले कि, कोरोना संक्रमणामुळे कर्मचाऱ्याच्या मृत्यूवर सरासरी ७० लाख रुपयांचा विमा संरक्षण देण्यात येईल. मृत्य झालेल्या कर्मचार्याच्या कायदेशीर वारसांना विम्याची रक्कम देण्यात येईल ही रक्कम कर्मचारी ठेव लिंक विमा योजनेत (EDLI) ७ लाख रुपयांच्या व्यतिरिक्त असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. या व्यतिरिक्त, हा ग्रुप त्यांच्या कर्मचार्यांच्या मृत्यूच्या तारखेपासून त्यांच्या कुटुंबीयांना तीन वर्षांसाठी आरोग्य विमा प्रदान करेल.
बॉश म्हणाले की, कोरोना विषाणूच्या साथीच्या दुसर्या लाटे दरम्यान ऑक्सिजन पुरवठा आणि आरोग्य सुविधांच्या गरजा भागविण्यासाठी या ग्रुपने बेंगळुरू आणि पुणे येथे कोविड केअर सेंटर सुरू केले.
तसेच ऑक्सिजन प्लांटमध्येही कंपनी गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले. या युनिट्स व्यवसायामध्ये मदतीसाठी समाजाची सेवा करतील. या ग्रुपने सांगितले की,' हा एक कठीण काळ आहे आणि समाजातील प्रत्येक घटकाने एकता आणि सहानुभूती दर्शविली पाहिजे.'