औरंगाबाद : वाळूज येथील बजाज ऑटो (Bajaj Auto) कंपनीने मोफत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचा प्रारंभ शुक्रवारी (ता.२८) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. बजाजचे चार हजार कामगार, कर्मचारी व अधिकारी यांच्यासह त्यांच्या कुटूंबियांना या लसीकरणाचा लाभ मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.
कोरोनाचा संसर्ग (Corona) वाढत असल्यामुळे कामगारांना कंपनीतच लस मिळावी. म्हणून बजाज कंपनीच्या वतीने कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत कोविड लसीककरण केंद्र सुरू केले.
लसीकरण मोहिमेसाठी बजाज ऑटोने कामगार व त्यांच्या कुटुंबियासाठी लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे इंडस्ट्री ही समाजापासून वेगळी राहूच शकत नाही. ही प्रंशसीय बाब आहे असे श्री.चव्हाण यांनी यावेळी म्हणाले.
बजाज ऑटो लिमिटेड कंपनीचे ज्या-ज्या ठिकाणी प्लांट आहे. त्या सर्व प्लांटमधील कामगार व त्यांच्या कुटुंबियांना लस मिळावी म्हणून कंपनीच्या वतीने लस खरेदी करण्यात आली आहे. ती कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार आहे. संकट काळी सर्व कंपन्यांनी एकत्र येऊन समाजाभिमुख कार्य केल्यास औरंगाबादचे नाव निश्चितच उज्ज्वल होईल, असे बजाज ऑटोचे सीएसआर सल्लागार चंद्रप्रकाश त्रिपाठी म्हणाले. कार्यक्रमास बजाज ऑटो कंपनीचे उपाध्यक्ष अभय पत्की, उपाध्यक्ष सुहास कुलकर्णी, विभागीय व्यवस्थापक अनिल मोहिते, व्यवस्थापक सचिन ठाले, प्रदीप गुंजाळ, विजय तिवाटणे आदींची उपस्थिती होती.