कंपनी करणार कोविड-प्रभावित कर्मचाऱ्यांना, कुटुंबियांना मोठी मदत

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना हे संक्रमण रोखण्यासाठी तसेच कंपनीतील कामगार, कर्मचारी यांना सुरक्षित वातावरण व मदत करण्यासाठी अनेक कंपन्या पुढे येत आहेत यामध्ये लार्सन अँड टुब्रो (Larsen & Toubro (L&T)) यांनीही कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या आर्थिक मदतीच्या आणि इतर सुविधांबाबतच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ज्या कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांना कंपनीकडून विमा आर्थिक मदत त्याचबरोबर या मृत कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठीचा खर्च देखील कंपनी उचलणार आहे.

लार्सन अँड टुब्रो (एलअँडटी) (Larsen & Toubro (L&T)) या कंपनीने बुधवारी कोरोनाव्हायरस संक्रमणामुळे पीडित कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक आणि विमा सहाय्य जाहीर केला.

यानुसार कोविड-१९ मुळे एखाद्या कर्मचा-याचा मृत्यू झाल्यास १००% विम्याची रक्कम (रु.३५ लाख) 

त्याच बरोबर ग्रुप पॉलिसी नुसार रु.५० लाख देण्यात येणार आहे.

कोरोनामुळे सेवेत असताना मृत झालेल्या कर्मचारी यांच्या ३ वर्ष ते २५ वर्ष गटातील पाल्यांकरिता शैक्षणिक मदत केली जाईल. यानुसार जे विद्यार्थी पूर्व-प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शिकतात ते या योजनेत पात्र आहेत. याकरिता प्रत्येक आर्थिक वर्षासाठी १ लाख रुपयाच्या मर्यादेसह ७५% कोर्स फीची भरपाई केली जाईल,

"जीवितहानीची जागा घेण्याचे काहीच पर्याय नाही, तथापि या विमा संरक्षण सह,आवश्यकतेनुसार कमीतकमी आमच्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना आवश्यक ते सहकार्य आणि मदत देण्याचे आमचे ध्येय आहे. आम्हाला या परिस्थितीमध्ये दृढ आणि एकत्रित राहावे लागेल यापरिस्थितीत संघर्ष, सामर्थ्याने आणि जोमाने या टप्प्यात पुढे जावे लागेल.", असे लार्सन अँड टुब्रो (Larsen & Toubro (L&T)) यांनी निवेदनाद्वारे सांगितले.