DHL Supply Chain India Pvt Ltd येथे वेतनवाढ करार संपन्न

पनवेल : DHL Supply Chain India Pvt .Ltd कंपनी व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना प्रेरित DHL युनियन यांच्यात सकारात्मक चर्चा होऊन दुसरा पगारवाढीचा करार करण्यात आला. ही पगारवाढ १ ऑक्टोबर २०१९ ते ३० सप्टेंबर २०२२ कालावधी करता असेल. 

वेतनवाढ करार पुढील प्रमाणे : 

करार तीन वर्षासाठी - १ ऑक्टोबर २०१९ ते ३० सप्टेंबर २०२२

स्किल कामगारांना : २७००/-, 

सेमी स्किल कामगारांना : २०००/- 

अनस्किल कामगारांना : १२००/- 

दर सहा महिन्यांनी मिळणारा विशेष महागाई भत्ता (Special Allowance) 

तसेच गेल्या २० महिन्याची थकबाकी 

१५ कामगारांचे प्रमोशन  

२ जुन्या कामगारांना नोकरी वरून कमी करण्यात आले होते, त्यांना कामावर पुन्हा घेण्यात आले. 

       यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस मा.गजानन नारायण राणे व कामगार सेनेचे पदाधिकारी आण्णा साहेब लोखंडे, प्रतिक राणे, अमोल पिसाळ व कंपनी व्यवस्थापन तर्फे सौ.बिना मॅडम, ओव्हेन सर, नवीन सर त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टर रवी दुर्गे तसेच युनियन कामगार प्रतिनिधी प्रविण हारपुडे (अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य- मनकासे), प्रदिप पवार, नितेश पाटील, योगेश भोईर, रवी पाटील, कृष्णा पाटील, स्वप्नील लहाने, स्वप्नील घरत हे उपस्थित होते.

या पगारवाढीबद्दल DHL युनियन च्या सर्व कामगारांनी व कामगार कमिटी मेंबरने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे आणि प्रदेश सरचिटणीस मा.गजानन नारायण राणे व सर्व पदाधिकारांचे मनापासुन खुप-खुप आभार मानले. येत्या काही दिवसात राहिलेले प्रश्न सुद्धा आपण मार्गी लावु असे आश्वासन सरचिटणीस गजानन राणे यांनी  कामगारांना दिले.