हिंजवडी,पुणे : सामाजिक भान ठेवुन सीएसआर फंडातुन अॅडिएंट इंडिया प्रा.लिमिटेड (Adient India Pvt Ltd) व्यवस्थापन यांनी हिंजवडी ग्रामीण रुग्णालय व विप्रो कोव्हिड सेंटर साठी रोज उपचारासाठी लागणारे साहित्य मदत म्हणून देण्यात आले. तसेच ग्रामीण रुग्णालय व विप्रो कोव्हिड सेंटर मधील व्यवस्थापन यांच्याशी चर्चा करून मास्क, सॅनिटायझर, वजन मशिन, ग्लुकोमीटर, पंखे, रूग्ण चेक अप साठी लागणारा टेबल, बिस्किट बाॅक्स व इतर वस्तु मदत स्वरूपात देण्यात आले. गेल्या वर्षी देखील सीएसआर निधी अंतर्गत हिंजवडी पोलिस बांधवांना कोरोना पासुन बचावात्मक साहित्य मदत म्हणून देण्यात आले होते.
यासाठी कंपनीचे एच आर डायरेक्टर अलोक वत्सा, उत्पादन डायरेक्टर गुरूराज कुलकर्णी, कारखाना मॅनेजर निलेश बेलसरे, एच आर मॅनेजर सतीश कुलकर्णी, विनोद वठारे, अॅडमिन अधिकारी उदय ओक, उत्पादन विभाग उत्तम काकडे, जयवंत जगताप, योगेश हेडळकर व अॅडमिन टीम यांनी सहकार्य केले.