कामगार,कर्मचारी यांना पीएफ मधून काढता येणार आगाऊ रक्कम

इपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने , कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर आपल्या सदस्यांना दुसऱ्यांना आगाऊ रक्कम काढण्याची दिली परवानगी

कोविड -१९ महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

कोविड-१९ महामारीच्या दुसऱ्या लाटेत आपल्या गुंतवणूकदारांना सहकार्य करण्यासाठी ईपीएफओने (EPFO) अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (Employees Provident Fund Association) दुसऱ्यांदा बिगर परतावा आगाऊ रक्कम काढायला परवानगी दिली आहे. महामारीच्या काळात सदस्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत (PMGKY) मार्च २०२० मध्ये ही आगाऊ रक्कम काढण्याची विशेष तरतूद केली होती.

श्रम आणि रोजगार मंत्रालयाने (Ministry of Labour & Employment), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना, १९५२ मधे उप-परिच्छेद (३) ची, परिच्छेद 68L अंतर्गत भर घालत सुधारणा केली आहे. तशी अधिकृत गॅझेटमधे अधिसूचनाही दिली आहे.

या तरतुदीनुसार, ३ महिन्याच्या मूळ वेतन आणि महागाई भत्त्याइतकी किंवा तुमच्या इपीएफ खात्यात असलेल्या रक्कमेपैकी ७५ टक्के रक्कम, यापैकी कमी असेल इतकी बिगर परतावा रक्कम उपलब्ध केली जाईल. सदस्य यापेक्षा कमी रकमेसाठीही अर्ज करु शकतात.

कोविड -१९ काळात आगाऊ रक्कम काढण्याची सुविधा ईपीएफ सदस्यांना खूपच सहाय्यभूत ठरते आहे, विशेषत: ज्यांचे वेतन दरमहा १५ हजार रुपयांपेक्षाही कमी आहे. आजच्या  तारखेपर्यंत ईपीएफओने  ७६.३१ लाख कोविड -१९ आगाऊ दावे निकाली काढले असून त्यापोटी १८,६९८.१५ कोटी रुपयांचे वाटप केले आहे.

कोविड -19 महामारीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान म्युकरमायकॉसिस किंवा काळी बुरशीला नुकतेच साथीचा आजार घोषीत केले आहे. अशा कसोटीच्या काळात आपल्या सदस्यांना आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी ईपीएफओ, मदतीचा हात देत आहे.

कोविड -१९ च्या पहिल्या आगाऊ रक्कमेचा लाभ घेतला आहे ते सदस्य आता दुसऱ्यांदाही आगाऊ रक्कम काढू शकतात.

दुसऱ्यांदा कोविड १९ आगाऊ रक्कम काढण्याची तरतूद आणि प्रक्रिया पाहिल्याप्रमाणेच आहे.

या कसोटीच्या काळात , सदस्यांना तातडीने आर्थिक मदतीची गरज आहे हे लक्षात घेता, कोविड -१९ च्या दाव्यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

दावे दाखल झाल्यानंतर तीन दिवसात ते निकाली काढण्यासाठी ईपीएफओ कटिबद्ध आहे. इपीएफओने यासाठी तंत्रज्ञानांधारित ऑटो-ड्रिवन प्रक्रीया राबवली आहे. यासाठी संबंधित सदस्यांनी केवायसीचे सर्व निकष पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. इपीएफओला,या प्रक्रियेमुळे केवळ तीन दिवसात दावे निकाली काढणे शक्य होत आहे, एरवी याच कामासाठी नेहमीच्या नियमाप्रमाणे वीस दिवस लागतात.

EPFO allows its members to avail second COVID-19  advance

Decision taken in view of second wave of Covid19 pandemic

To support its subscribers during the second wave of COVID-19 pandemic, EPFO has now allowed its members to avail second non-refundable COVID-19 advance. The provision for special withdrawal to meet the financial need of members during pandemic was introduced in March 2020, under Pradhan Mantri Garib Kalyan Yojana (PMGKY). An amendment to this effect was made by Ministry of Labour & Employment in Employees’ Provident Funds Scheme, 1952 by inserting therein sub-para (3) under paragraph 68L, through notification in the Official Gazette.

Under this provision, non-refundable withdrawal to the extent of the basic wages and dearness allowances for three months or up to 75% of the amount standing to member's credit in the EPF account, whichever is less, is provided. Members can apply for lesser amount also.

The COVID-19 advance has been a great help to the EPF members during the pandemic, especially for those having monthly wages of less than Rs. 15,000. As on date, EPFO has settled more than 76.31 lakh COVID-19 advance claims thereby disbursing a total of Rs. 18,698.15 crore.

During the second wave of Covid-19 pandemic, ‘mucormycosis’ or black fungus has been declared an epidemic recently. In such trying times, EPFO endeavours to lend a helping hand to its members by meeting their financial needs. Members who have already availed the first COVID-19 advance can now opt for a second advance also. The provision and process for withdrawal of second COVID-19 advance is same as in the case of first advance.

Considering urgent need of members for financial support in these trying times, it has been decided to accord top priority to COVID-19 claims. EPFO is committed to settle these claims within three days of their receipt. For this, EPFO has deployed a system driven auto-claim settlement process in respect of all such members whose KYC requirements is complete in all respects. Auto-mode of settlement enables EPFO to reduce the claim settlement cycle to just 3 days as against the statutory requirement to settle the claims within 20 days.