सध्या कोरोना महामारी व लॉकडाऊन च्या परस्थिती मध्ये वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यातील सर्व कामगार घराबाहेर पडुन मोबाईल टॉवरची देखभाल व दुरुस्तीचे काम अहोरात्र करत आहेत. या कामगारांचे लसीकरण त्वरित करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य मोबाईल टॉवर टेक्निकल एप्लॉईज असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आली आहे.
मोबाईल कंपन्यातील सर्व कामगार घराबाहेर पडुन मोबाईल टॉवरची देखभाल व दुरुस्तीचे काम अहोरात्र करत त्यामुळेच अत्यावश्यक असण्याऱ्या मोबाईल नेटवर्क ची सेवा अखंडीत पणे चालु राहत आहे व त्यावर अवलंबुन असणाऱ्या सर्व खाजगी, शासकीय यंत्रणा, सर्वसामान्य नागरीक यांना त्याचा फायदा होत आहे. इतर अत्यावश्यक क्षेत्रामध्ये सेवा पुरणारे शासकीय अधिकारी / कामगार / कर्मचारी/ याचे प्रमाणे जीवावर उदार होउन सदर कामगार आपले कर्तव्य बजावत आहेत. या कारणास्तव शासनाने राज्यातील प्रत्येक जिल्हयामध्ये उपाय योजना करून मोबईल टॉवरची सेवा पुरवणाऱ्या कामगारांचे "प्राधान्याने " लसीकरण करावे. तसे आदेश राज्य सरकारने अरोग्ययंत्रणा यांना दयावेत.अशी मागणी असोसिएशन संघटने कडून करण्यात येत आहे.
असोसिशन च्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि मुख्य कामगार व प्रशासन सचिव यांना पत्र व मेल पाठवून मोबाईल टॉवर कामगारांचं प्राधान्याने लसीकरण करावे अशी मागणी केली असल्याबाबत माहिती मोबाईल टॉवर टेक्निकल एप्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष सदाशिव खेडकर यांनी दिली.