बेलॉटा कंपनीत (Bellota Agrisolutions & Tools Private Limited ) वेतनवाढ करार संपन्न

The wage increase agreement was signed after a positive discussion between the management of Bellota Agrisolutions & Tools Private Limited and The President of Nashik Workers Union Dr. DL Karad.

सिन्नर : येथील बेलॉटा अ‍ॅग्रीसोल्यूशन्स अँड टूल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापन व नाशिक वर्कर्स युनियनचे अध्यक्ष डॉक्टर डी.एल.कराड यांच्या सकारात्मक चर्चा होऊन पगारवाढीचा करारावर सह्या करण्यात आल्या. ही पगारवाढ १ जुलै २०२० पासून लागू होईल. मागील फरकासह पगारवाढीच्या करारावर सह्या करण्यात आल्या.

वेतनवाढ करार पुढील प्रमाणे :

  • सर्व कामगारांना ८४००/- सर्व पगारात वाढ 

  • राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार वेळोवेळी येणारा महागाई भत्ता वाढ 

  • दरमहा ७८०/- रुपये पेट्रोल अलाउन्स 

  • दरवर्षी दोन लाखांची मेडिक्लेम पॉलिसी 

  • दरवर्षी मिळत असलेल्या पी.एल मध्ये अजून २ पी.एल वाढ 

  • सर्वांना बोनस म्हणून पूर्ण पगार

   यावेळी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष डॉ. डी.एल कराड, कंपनीचे संचालक प्रशांत जोशी, युनियनचे उपाध्यक्ष तुकाराम सोनजे, चिटणीस अरविंद शहापुरे, गौतम कोंगळे, कमिटी मेंबर्स अजित लोखंडे, योगेश गायकवाड, चंदर शितोळे, भारत गोलसर, प्रवीण रानडे, सागर रजनोर, तुकाराम कडभाने आदी उपस्थित होते.