बेंटलर ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,चाकण (Benteler Automotive India Pvt Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

The wage increase agreement between the management of Benteler Automotive INDIA Pvt Ltd and Shivkranti Kamgar Sanghatana.

चाकण : खालुंम्ब्रे,चाकण येथील बेंटलर ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व शिवक्रांती कामगार संघटना यांच्या सकारात्मक चर्चा होऊन पगारवाढीचा करारावर सह्या करण्यात आल्या. वेतन कराराचा कालावधी दि.१ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२३ या तीन वर्षासाठी रुपये १७,५००/- इतकी पगार वाढ झाली आहे.

वेतनवाढ करार पुढील प्रमाणे :

  • करार १ जानेवारी २०२१ पासून तीन वर्षासाठी (दि.१ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२३) 

  • रुपये १७,५००/- इतकी पगार वाढ

          पहिल्या वर्षी : ७,०००/-

          दुसऱ्या वर्षी : ५,२५०/-

           तिसऱ्या वर्षी : ५,२५०/-

  • मासिक Attendance Allowance  पूर्ण हजेरी साठी रु.२५००/- व १ सुट्टी साठी रु.१२५०/-

  • वार्षिक Leave CL-१०, SL- ०४, Ph - ०९, EL- १८ ( २४० दिवसा साठी) व त्या पुढील प्रत्येक १० दिवसाला १

  • नाईट शिफ्ट भत्ता रु. ७०/- प्रति दिन

  • मेडिक्लेम पॉलिसी ४+२ साठी रु.२ लाख व १० लाख बफर

  • ग्रुप Accident पॉलिसी रु.२० लाख , नैसर्गिक मृत्यू रु.१० लाख

  • वर्षातून एकदा फॅमिली स्नेहसंमेलन, तसेच एकदा बॅचलर ट्रिप किंवा स्नेहसंमेलन

  • वर्षातून एकदा Inter Dept Cricket Matches 

  • Canteen & Bus facility चालू आहे तशी Continue... 

यावेळी शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस विजय पाळेकर, रवींद्र साठे, गुलाबराव मराठे, राजेंद्र पवार, प्रतिक पाळेकर, रोहन आहेर कंपनीच्या व्यवस्थापन वतीने जनरल मॅनेजर मुकुंद गणगणे, एच,आर अशोक आटोळे युनिटच्या वतीने अध्यक्ष दिपक टिळेकर, उपाध्यक्ष सुशांत ढवळसकर, कार्याध्यक्ष पांडुरंग आहेर, खजिनदार सतीश केदारी, सरचिटणीस/ संघटक/सातारा जिल्हा प्रमुख आनंदा शिंदे आदी उपस्थित होते.