महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कल्याणकारी योजनांचा कामगारांना लाभ, सुमारे २ कोटी २९ लाख रक्कम कामगारांना वितरित


Maharashtra Labour Welfare Board welfare schemes benefit the workers, about 2 crore 29 lakh amount distributed to the workers

पुणे : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र राज्य शासना अंतर्गत कामगार विभागातील स्वायत्त मंडळ महाराष्ट्र राज्यात समाजातील विविध घटकातील नोंदणीकृत कामगारांना दर्जेदार कल्याणकारी योजना, कार्यक्रम व सुविधा पुरवुन त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे जीवनमान उंचाविणे, तसेच मंडळाच्या कल्याणकारी योजनांद्वारे त्यांची सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक आर्थिक व मानसिक उन्नती घडविणे या ध्येयानुसार आपले कार्य अविरतपणे सुरु ठेवले आहे. कामगारांचे सर्वंकष समाधान करणाऱ्या कल्याणकारी कार्यक्रमांचे नियोजनबद्ध व पध्दतशीर आयोजन करुन मंडळाचे उद्दीष्ठ साध्य करणे. अशा गुणवत्ता धोरणाच्या आधारावर हे मंडळ कार्यरत आहे. 

     कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ च्या कक्षेत येणारे विविध आस्थापनेतील  कर्मचारी, ज्यांचा दरवर्षी जुन व डिसेंबरच्या वेतनातून कामगार कल्याण निधी कपात होतो. त्या सर्वांकरिता या मंडळाद्वारे विविध कल्याणकारी उपक्रम  व योजना राबविल्या जातात.

      कामगार मंत्री हसन  मुश्रीफ, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडु, कामगार कल्याण रविराज इळवे यांचे मार्गदर्शना खाली सन २०२० - २१ या सालाकरीता कोव्हीड १९ या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व निर्माण झालेली लॉक डाऊन ची परीस्थिती चा विचार करून कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मंडळाच्या कल्याणकारी योजना ऑनलाईन पद्धतीने देण्याचा अभिनव प्रयोग करण्यात आला आणी या प्रयत्नाला यश येऊन सर्व कामगार व कामगार कुटुंबीय यांना लॅाकडाऊनमध्ये घरी असूनही ऑनलाईन पध्दतीने कामगार पाल्यांना मंडळाच्या योजनांचा अर्ज सुलभपणे सादर करता आला व योजनांचा लाभ घेता आला.

पुणे विभागांतर्गत सन २०२०-२१ या वर्षात पुढील प्रमाणे लाभ देण्या आला.

  • सर्वसाधारण शिष्यवृत्ती योजनेचा लाभ ७४२८ कामगार कुटुंबिय लाभार्थींना रक्कम २ कोटी ६ लाख ८२ हजार ५०० रुपये इतका देण्यांत आला. 

  • परदेश शिक्षण शिष्यवृत्ती १६ लाभार्थी रक्कम रु ८ लाख 

  • क्रीडा शिष्यवृत्ती एकूण लाभार्थी २२ रक्कम रु १ लाख १० हजार 

  • पाठ्यपुस्तक सहाय्य अंतर्गत २३९ लाभार्थी व रक्कम रुपये २ लाख ५२ हजार ४२०

  • एम.एस.सी.आय.टी. योजनामधुन ३५ लाभार्थी रक्कम रुपये ७३ हजार

  • गंभीर आजार उपचार सहाय्यता योजनेचे ४९ लाभार्थी रक्कम रुपये १० लाख ५ हजार 

  • १० वी व १२ वी गुणवत्ता प्राप्त १८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ हजार, प्रमाणे  ९०  हजार रुपये देण्यांत आली.

सदरची रक्कम संबधीत लाभार्थी यांना त्यांचे बँक खातेवर आरटीजीएस/एनईएफटी व्दारा जमा करण्यात आली आहे.

     सोलापूर जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहीते मूळे सदर जिल्हातील लाभार्थी व रक्कमेचा समावेश करण्यात आलेला नाही आचारसंहिता संपताच सदर तपशील जाहीर करून रक्कम संबंधीतांच्या खात्यावर वर्ग केली जाईल. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडुन या वर्षात विविध आर्थिक लाभाच्या योजना व उपक्रमाच्या माध्यमातुन अंदाजे २ कोटी २९ लाख २३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य कामगार व कुटुंबिय यांना पुणे विभागीय कार्यालयाच्या वतीने वितरीत करण्यात आले आहेत अशी माहिती सहायक कल्याण आयुक्त समाधान भोसले यांनी दिले.