यशस्वी मध्यस्थी नंतर पुन्हा कामगार रुजू
खामगाव : खामगाव शहरातील एमआयडीसी भागात विदर्भात नावाजलेली एस एन जी व यश इंटरप्राइजेस कंपनी आहे. या कंपनीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कामगार संघटना असून संघटना अध्यक्ष प्रदीप निमकार्डे व सचिन मोरखडे या कामगार प्रतिनिधी यांना कंपनी व्यवस्थापनाने काल (दि.२३ एप्रिल) रोजी सकाळी कामावरून कमी केले.
त्यामुळे कंपनीत असलेल्या कामगारांनी आक्रमक पवित्रा घेत काम बंद करत कंपनीच्या गेटवरच ठिय्या आंदोलन केले व कंपनी मालक व व्यवस्थापन विषयी रोष व्यक्त केला यावेळी कंपनीमध्ये काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी पोलीस प्रशासनाचा सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त दिसून आला.
सदर घडलेल्या प्रकाराची माहिती कंपनीतील कामगार संघटनेच्या पदाधिकारी असलेल्या कामगारांनी मनसे महाराष्ट्र राज्य चिटणीस केतन नाईक, मनसेचे वरिष्ठ नेते तथा शॅडो मंत्री विठ्ठलराव लोखंडकार यांच्या सह मनसेच्या वरिष्ठ कामगार संघटनेच्या पदाधिकारी यांना माहिती दिली असता याची दखल घेत मनसे शॅडो कॅबिनेट मंत्री विठ्ठलराव लोखंडकार यांनी कंपनीचे मालक बिपिनजी गांधी यांच्याशी फोनवर चर्चा करून कामावरून कमी केलेल्या संघटनेच्या अध्यक्ष व इतर पदाधिकारी असलेल्या कामगारांना त्वरित कामावर घ्यावे व कामगारांवर अन्याय होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच कामगारांच्या मदतीकरिता त्वरित मनसे जिल्हाध्यक्ष यांना फोन करून घटनास्थळावर प्रत्यक्षजाऊन प्रश्न सोडविण्याचे सांगितले.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष मदन राजे गायकवाड यांनी सुद्धा घटनेचे गांभीर्य ओळखून कामगारांच्या हिताकरिता चिखली वरून खामगाव येथील एमआयडीसी भागातील यश इंटरप्राइजेस येथे हजर झाले यावेळी त्यांच्यासोबत वाहतूक सेनेचे जिल्हाध्य शिवा लगर, खामगाव शहराध्यक्ष आनंद गायगोळ, आकाश पाटील या सर्व हजर झालेल्या पदाधिकाऱ्यांनी कामगारांना सोबत घेऊन यश एंटरप्राइजेस च्या मॅनेजमेंट सोबत चर्चा करून त्वरित कामगारांना कामावर घ्या तसेच यानंतर कामगारांना कोणतीही अडचण यायला नको तसेच कामगारांवर अन्याय खपून घेणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत कंपनी मॅनेजमेंट सोबत चर्चा केली. कामगारांची व मॅनेजमेंटची समज-गैरसमज दूर करत चर्चा यशस्वी केली कंपनी मॅनेजमेंट ने कामावरून कमी केलेल्या कामगारांना त्वरित कामावर घेत मोठेपणा व माणूसकी दाखवल्याने कंपनीतील तणाव निवळला.
कामगारांच्या मदतीला त्वरित धावून गेलेल्या मनसे महाराष्ट्र राज्य चिटणीस केतन नाईक, मनसेचे वरिष्ठ नेते तथा शॅडो मंत्री विठ्ठलराव लोखंडकार, मनसे जिल्हाध्यक्ष मदन राजे गायकवाड, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवा लगर, शहर अध्यक्ष आनंद गायगोळ, आकाश पाटील यांचे आभार मानत कंपनीतील कामगारांनी आनंद व्यक्त केला. कामगारांना कामावर घेतल्याने कामगारांनी चालवलेल्या ठिय्या आंदोलन सुद्धा त्वरित मागे घेण्यात आले. तसेच कंपनीतील कामकाज पूर्ववत सुरू झाले.