समाजातील सर्वच घटकांच्या उन्नती व प्रगतीसाठी, राज्यातील तज्ञ व निष्णात मान्यवरांकडून आयोजन
राज्यातील सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला-क्रिडा, संघटना व आस्थापना अशा विविध पातळीवर उल्लेखनीय काम करणाऱ्या कामगारांना, राज्य शासनाच्या कामगार विभागामार्फत,"गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार" देवून सन्मानित केले जाते. अशा राज्यातील सर्वच जिल्ह्यातील प्रमुख गुणवंत कामगारांनी विधायक कार्य करण्याच्या उद्देशाने एकत्र येऊन, 'राज्य गुणवंत कामगार असोसिएशन' महाराष्ट्र राज्यची, स्थापना केलेली आहे.
राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे, सर्व क्षेत्रातील कामगार, कामगार कुटुंबीये व त्यांची पाल्ये यांच्या सर्वांगीण उन्नती व प्रगतीसाठी असोसिएशनच्या ध्येय, धोरण व उद्देशानुसार सातत्याने "गुगल मिटच्या" माध्यमातून ऑनलाईन "प्रबोधनात्मक, सांस्कृतिक व कामगार चळवळ" विषयक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामध्ये आजअखेर प्रामुख्याने...
१) "संघटना बांधणी शास्त्र व कला" -
कार्यक्रमाचे वक्ते - अनिल म्हमाने (अध्यक्ष - सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंट, कोल्हापूर), कार्यक्रमाचे होस्ट - शिवाजी चौगले (कोल्हापूर), कार्यक्रमाचे स्वागत - केरबा डावरे - (ठाणे), कार्यक्रमाचे प्रास्ताविक - नरेंद्र रहाटे (चंद्रपूर), चॅटद्वारे आलेले मेसेज वाचन - रत्नाकर शिंदे (नांदेड), कार्यक्रमाचे अध्यक्ष - सुरेश केसरकर (कोल्हापूर), कार्यक्रमाचे आभार - अच्युतराव माने (उस्मानाबाद).
२) "सुखी जीवनाची गुरुकिल्ली"
कार्यक्रमाचे वक्ते - डॉ. जयंत करंदीकर (प्रसिद्ध प्रवचनकार कुर्डूवाडी सोलापूर), कार्यक्रमाचे संयोजक - सुरेश केसरकर (कोल्हापूर), कार्यक्रमाचे होस्ट - निलेश सोमाणी (वाशिम), कार्यक्रमाचे स्वागत - सुहास वड्डीकर (सांगली), कार्यक्रमाचे प्रास्ताविक - श्रीकृष्ण अरखराव (नाशिक), चॅटद्वारे आलेले मेसेज वाचन - देवराव कोंडेकर (गडचिरोली), कार्यक्रमाचे अध्यक्ष - दिलीप घोलप (मुंबई), चॅटद्वारे आलेल्या मेसेजचे वाचन - अशोक जाधव (सातारा), कार्यक्रमाचे आभार - गोविंद पाचपोर (जालना).
३) सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रम - "कथाकथन"
कार्यक्रमाचे वक्ते - प्रा.अशोक कुंभार (प्रसिद्ध कथा, कादंबरी, कवी, साहित्यिक), कार्यक्रमाचे संयोजक - सुरेश केसरकर (कोल्हापूर), कार्यक्रमाचे स्वागत - संजय कदम (मुंबई), कार्यक्रमाचे प्रास्ताविक - किसन शिरलेकर (परभणी), कार्यक्रमाचे अध्यक्ष - सुधीर मुंडे (बीड), चॅटद्वारे आलेले मेसेज वाचन - महादेव चक्के (कोल्हापूर), कार्यक्रमाचे आभार - मारुती जाधव (नाशिक).
४) "आपत्ती काळानंतरचे आर्थिक नियोजन"
कार्यक्रमाचे वक्ते - मनमोहन राजापाटील (सरचिटणीस महाबँक नवनिर्माण सेना), कार्यक्रमाचे होस्ट - शिवाजी इंगवले (सातारा), कार्यक्रमाचे स्वागत - अरुणकुमार आठवले (अमरावती), कार्यक्रमाचे प्रास्ताविक - बाबासाहेब गरड (उस्मानाबाद), चॅटद्वारे आलेले मेसेज वाचन - सुरेश केसरकर (कोल्हापूर), कार्यक्रमाचे अध्यक्ष - सलीमोद्दीन शेख (हिंगोली), कार्यक्रमाचे आभार - धनंजय पाटील (पालघर)
५) "देशभक्तीपर गीते"- (सांस्कृतिक कार्यक्रम)
गायक - बाजीराव चौगुले (जेष्ठ व सुप्रसिद्ध गायक), कार्यक्रमाचे संयोजक - सुरेश केसरकर (कोल्हापूर), कार्यक्रमाचे होस्ट - दिलीप साटम (सिंधूदुर्ग), कार्यक्रमाचे स्वागत - मुकुंद कोकणे (औरंगाबाद), कार्यक्रमाचे प्रास्ताविक - शरद पाटील (रायगड), कार्यक्रमाचे अध्यक्ष - महादेव चक्के (कोल्हापूर), कार्यक्रमाचे आभार - प्रकाश बाडकर (मुंबई)
६) "मन करा रे प्रसन्न" (आपत्ती काळातले मानसिक आरोग्य)
कार्यक्रमाचे वक्ते - भगवान नारकर (सिनेअभिनेते), कार्यक्रमाचे होस्ट - काशिनाथ जनगावे (लातूर), कार्यक्रमाचे स्वागत - रामेश्वर वरखडे (जालना), कार्यक्रमाचे प्रास्ताविक - प्रभाकर कांबळे (मुंबई) , कार्यक्रमाचे अध्यक्ष - अनिल मावळे (अकोला), चॅटद्वारे आलेले मेसेज वाचन - सुरेश केसरकर (कोल्हापूर), कार्यक्रमाचे आभार - सुरेश साबळे (बुलढाणा)
७) "जनतेचा पैसा, जनतेच्या भल्यासाठी"
कार्यक्रमाचे वक्ते - देवीदास तुळजापूरकर (ए. आय.बी.ई.ए चे जाईंट सेक्रेटरी), कार्यक्रमाचे होस्ट - नितीन गादेवार (गोंदिया), कार्यक्रमाचे स्वागत - अरविंद मोरे (मुंबई), कार्यक्रमाचे प्रास्ताविक - शिवाजी चौगुले (कोल्हापूर), चॅटद्वारे आलेले मेसेज - संजय सुर्वे (रत्नागिरी), कार्यक्रमाचे अध्यक्ष - सुरेश केसरकर (कोल्हापूर), कार्यक्रमाचे आभार - चंद्रसेन डोंगरे (वर्धा)
८) "ऑनलाइन कविसंमेलन"
कार्यक्रमाचे होस्ट - भारत सपकाळ (मुंबई), कार्यक्रमाचे स्वागत - अरविंद जनबदकर (यवतमाळ), कार्यक्रमाचे प्रास्ताविक - आबासाहेब शिंदे (लातूर), कार्यक्रमाचे अध्यक्ष - सुरेश केसरकर (कोल्हापूर), कार्यक्रमाचे आभार - प्रताप घेवडे (कोल्हापूर), कार्यक्रमाचे परीक्षक - राजेंद्र निकमसो, मा. डॉ. डॅनियल काळेसो, प्रा. करूणा मिणचेकर मॅडम
९) "सेवानिवृत्त कामगार कर्मचारी पेन्शन योजना - १९९५ संदर्भात सद्यस्थिती, कायदेशीर तरतुदी व हक्क"
कार्यक्रमाचे वक्ते - अतुल दिघे (सहनिमंत्रक EPS पेन्शनर अखिल भारतीय समन्वय समिती व राष्ट्रीय उपाध्यक्ष ऑल इंडिया सेंट्रल कौन्सिल ऑफ ट्रेड युनियन्स), कार्यक्रमाचे होस्ट - भगवान माने (कोल्हापूर), कार्यक्रमाचे स्वागत - दिलीप चरेगावकर (सातारा), कार्यक्रमाचे प्रास्ताविक - सुरेश केसरकर (कोल्हापूर), चॅटद्वारे आलेले मेसेज वाचन - गुलाबराव सोनवणे (नंदुरबार), कार्यक्रमाचे अध्यक्ष - सोपान बांगर (अहमदनगर), कार्यक्रमाचे आभार - शैलेंद्रनाथ इंगळे (जळगाव)
१०) "बदलते कामगार कायदे तथा सार्वजनिक उद्योगांचे होणारे खाजगीकरण व कामगार वर्गावर होणारा परिणाम"
कार्यक्रमाचे वक्ते - कृष्णाजी भोयर (राष्ट्रीय सचिव ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एम्प्लॉईज फेडरेशन), कार्यक्रमाचे होस्ट - प्रवीण भिके (कोल्हापूर), कार्यक्रमाचे स्वागत - सुधीर मुंडे (बीड), कार्यक्रमाचे प्रास्ताविक - भगवान पाटील (धुळे), चॅटद्वारे आलेले मेसेज वाचन - सुरेश केसरकर (कोल्हापूर), कार्यक्रमाचे अध्यक्ष - प्रमोद नागदेवे (भंडारा), कार्यक्रमाचे आभार - अरविंद देशमुख (नागपूर)
अशाप्रकारे सातत्याने कामगार आणि कामगार कुटुंबीये व त्यांची पाल्ये यांच्या सर्वांगीण उन्नती व प्रगतीसाठी, "राज्य गुणवंत कामगार असोसिएशन"च्यावतीने, विविध ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करुन समाजातील सर्वच घटकांचे प्रबोधन केले जात आहे.
यापुढील काळातही राज्यातील व देशातील तज्ञ व अभ्यासू वक्त्यांच्या माध्यमातून - अवयवदान, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच समाजातील ज्वलंत प्रश्न, कामगार गृहिणींसाठी बचत गट, लघु उद्योग, स्वावलंबन, आर्थीक बचत व त्याचे नियोजन, कामगार चळवळीस अनुसरून, विविध उपक्रमांचे आयोजन तसेच अनेक गुणवंत कामगार विविध क्षेत्रात पारंगत आहेत, त्यांच्या पुढाकाराने देखील वेगवेगळे उपक्रम राबविणेचे नियोजन व कोरोनाच्या काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा यथोचित गौरव करण्यात येणार आहे असे असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी राजेंद्र निकम (प्र. कामगार कल्याण अधिकारी, सांगली) व भालचंद्र कुरवलकर (शिक्षण संचालक - दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा एवं विकास बोर्ड, श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार) यांचे बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
हे सर्वच कार्यक्रम यशस्वी होणेकरीता, राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे पदाधिकारी, कार्यकारी सदस्य व जिल्हा कार्याध्यक्ष - नरेंद्र रहाटे, अच्युतराव माने, तात्यासाहेब भोसले, दिलीप घोलप, सुहास वड्डीकर, देवराव कोंडेकर, महादेव चक्के, केरबा डावरे, शिवाजीराव इंगवले, रामेश्वर वरखडे, किसन शिर्लेकर, संजय सुर्वे, धनंजय पाटील, सुधीर मुंडे, गुलाबराव सोनवणे, प्रभाकर कांबळे, नितीन गादेवार, मुकुंद कोकणे, काशिनाथ जनगावे, सोपान बांगर, दिलीप साटम, भगवान पाटील, अरविंद देशमुख, रत्नाकर शिंदे, मारूती जाधव, सलीमोद्दीन शेख, अनिल मावळे, शैलेंद्रनाथ इंगळे, अरविंद जनबदकर, शरद पाटील, निलेश सोमाणी, अरुणकुमार आठवले, चंद्रसेन डोंगरे, प्रमोद नागदेवे, सुरेश साबळे, भगवान माने, अशोकराव जाधव, श्रीकृष्ण अरखराव, गोविंदराव पाचपोर, संजय कदम, बाबासाहेब गरड आदिंचे व राज्यातील कामगार बंधू -भगिणींचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी सांगितले.