सुरक्षा रक्षकांच्या (Security Guards) विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना भारतीय सुरक्षा रक्षक कामगार सेनेचे नाशिक अध्यक्ष सचिन राऊत यांनी दिले होते यावरती कामगार मंत्री यांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सुरक्षा रक्षकांच्या मागण्या पूर्ण होणे गरजेचे याबाबत पत्र दिले अशी माहिती सचिन राऊत यांनी दिली.
मागण्या खालील प्रमाणे :
- सुरक्षा रक्षक १५ मंडळाचे एकत्रीकरण व सक्षम महामंडळ तयार करणे
- सुरक्षा रक्षक यांना एक समान वेतन व वाढती महागाई बाबत मिळणे
- पी.एफ.भविष्य निर्वाह निधी कार्यालयामध्ये जमा करणे
- सुरक्षा रक्षक यांना अपघात व मृत्यू विम्याचा लाभ मिळणे
- सुरक्षा रक्षकांच्या गणवेशामध्ये बदल करणे
- सुरक्षा रक्षकांना घरकुल योजनेचा लाभ मिळणे,
या मागण्या भारतीय सुरक्षा रक्षक कामगार सेनेच्या वतीने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या कडे करण्यात आल्या असून श्री. झिरवाळ यांनी लवकरच वरील मागण्यांसंदर्भात सबंधित मंत्री महोदयांकडे पाठपुरावा करु असे आश्वासन दिले.
