कोल्हापूर : राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या अण्णा माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश संयुक्त अध्यक्षपदी कोल्हापूरचे आंदोलक संजय पाटील यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष शेखर आण्णा शेट्टी यार यांनी केली याबाबतचे निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले.
यावेळी संजय पाटील म्हणाले ,माथाडी कामगारांना पुरेसे वेतन, आरोग्यसुविधा, सामाजिक सुरक्षितता, भविष्य निर्वाह निधी, घरभाडे भत्ता, पगारी रजा अशा विविध सुविधा शेवटच्या माथाडी कामगार पर्यंत पोहोचाव्यात यासाठी कार्यरत राहणार. त्याचबरोबर माथाडी मंडळांचे विलिनीकरण रोखण्यासाठी राज्यव्यापी लढा उभा करणार. माथाडी मंडळातील भ्रष्टाचाराला चाप लावून भांडाफोड करून त्यामध्ये पारदर्शकता आणून माथाडी कामगारांचे आर्थिक शोषण थांबवणार .त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र यांचे अभिनंदन होत आहे.