कोरोनाच्या प्रभावामुळे घरेलू कामगारांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे या संकटातून कामगारांना वाचविण्यासाठी घरेलू महिला कामगारांना तीन हजार रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र असंघटित कामगार संघटनेचे सरचिटणीस शरद पंडित यांनी केली आहे. याबाबत निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री याना निवेदन देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंडित म्हणाले २०१४ - २०१८ या कालावधीत तत्कालीन सरकारने घरेलू कामगार कल्याण मंडळ याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे शासकीय नोंदणी बंद झाली तसेच ज्यांची मान्य झाली त्यांचे पुढे नूतनीकरण करण्यात आले नाही त्यामुळे आजतागायत शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मतदारांना मिळाला नाही.
मागील वर्षाच्या कोरोनाच्या त्रासदायक वाईट प्रसंगातून आता कुठे घरेलू कामगार सावरत असतानाच पुन्हा कोरोना महामारीची दुसरी लाट आली आहे त्यामुळे आता राज्य सरकारने गांभीर्याने घरेलू कामगारांच्या मागणीचा विचार करून घरेलू कामगारांना तीन हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली.
संबंधित पोस्ट :
कामगार,असंघटित क्षेत्राला मुख्यमंत्री यांच्याकडून मदत जाहीर, राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध