कोरोना संसर्ग मुळे चाकण एमआयडीसी मधील कारखाने काही दिवस बंद करावेत - शरद बुट्टे पाटील

चाकण : कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत उद्द्योगांना कडक निर्बंध घातले असताना चाकण परिसरातील एमआयडीसी कार्यक्षेत्रातील सर्व कारखाने सुरू आहे. त्यामुळे शासनाने कितीही कडक निर्बंध लावले असले तरी या क्षेत्रात कुठलेही निर्बंध कारखाने पाळत नाही त्यामुळे कोरोना संसर्ग प्रमाण वाढत असून चाकण एमआयडीसी मधील कारखाने काही दिवस बंद करावेत अशी मागणी जिल्हा परिषद गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन केली आहे.

पत्रामध्ये म्हणाले आहे कि, चाकण एमआयडीसी कार्यक्षेत्रातील सर्व कारखाने सुरू आहे त्यामुळे शासनाने कितीही कडक निर्बंध लावले असले तरी या क्षेत्रात कुठलेही निर्बंध कारखाने पाळत नाही. गतवर्षीच्या लॉकडाउन मध्ये काही दिवस सर्व कारखाने बंद केल्यामुळे कोरोना संसर्ग आटोक्यात आला होता.

    कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना कारखाने करत नाहीत या कारखान्यांनी कामगारांची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करणे गरजेचे आहे. कामगार कामावरून गावात येतात व त्यांचे कुटुंबांकडून गावात संसर्ग वाढत असून अशीच परिस्थिती राहिली तर एमआयडीसी कार्यक्षेत्रातील गावांमधील कोरोना परिस्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.

 कामगार हा देखील महत्त्वाचा घटक आहे त्याचे जीवावर कारखाने चालतात मग त्यांचे आरोग्याच्या दृष्टीने कारखान्यांनी उपाययोजना करणे गरजेचे आहे तसेच तातडीने काही दिवस कारखाने बंद करून १०० टक्के कामगारांचे लसीकरण होणे गरजेचे आहे असे शरद बुट्टे पाटील यांनी सांगितले.