ईपीएफओने (EPFO) ने सुरु केली नवी सुविधा, आता सदस्य ऑनलाईन नामनिर्देशन (वारस नोंदणी) करू शकतील

ईपीएफ (EPFO) ग्राहकांना सुविधा देण्यासाठी ईपीएफओने आणखी एक ई-उपक्रम अर्थात आधार (Aadhar) आधारित ई-नामनिर्देशन (वारस नोंदणी) सुरू केले आहे. सध्या नामनिर्देशन हे ‘फॉर्म २ (सुधारित)’ भरून केले जात होते, परंतु आता ई-नामनिर्देशन सुविधा सुरू झाल्यावर सदस्य स्वतः पोर्टलवर उपलब्ध असलेल्या ई-नामनिर्देशन सुविधेचा वापर करुन ऑनलाईन नामनिर्देशन अर्ज दाखल करू शकतात.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ईपीएफ सदस्यांचे मोबाईल नंबर यूएएनशी जोडलेला असणे गरजेचे असून आधार पडताळणी झालेली असणे आवश्यक आहे. हि नोंदणी प्रक्रिया खूप सोपी असून लवकरात लवकर ई-नामनिर्देशन भरण्याचा सल्ला सर्व सदस्यांना देण्यात आला आहे. 

यामुळे आत्ता सहजपणे उपलब्ध ई-नामनिर्देशन सदस्य / लाभार्थींना सहजपणे ऑनलाईन पेन्शन दावा दाखल करू शकतात आणि सदस्याचे निधन झाल्यास त्याचा / तिचा नामनिर्देशीत उमेदवार रजिस्टर मोबाईल वरती ओटीपीच्या आधारे ऑनलाईन दावा दाखल करू शकेल. हि ऑनलाईन सुविधा प्राप्त झाल्यामुळे आत्ता कंपनी किंवा नियोक्ता यांच्याकडे जाऊन अर्ज करण्याची गरज नाही.

सर्व ईपीएफ सदस्यांना युनिफाइड पोर्टलच्या मेंबर इंटरफेसवर (https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/) तत्काळ आपला ई-नावनोंदणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुढे सर्व ईपीएफ सदस्यांना आधार आणि बँक खाते सारख्या मूलभूत केवायसी त्यांच्या यूएएनमध्ये घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे, जेणेकरून ते ईपीएफओकडून ऑनलाइन सेवा घेऊ शकतील. 

सध्याच्या कोरोना परिस्थितीमध्ये नियोक्ता किंवा ईपीएफ कार्यालयात अर्ज न करता तसेच तेथे न जाता ऑनलाईन दावा दाखल करून पुरविल्या जाणार्‍या विविध ऑनलाइन सेवांचा वापर करा.