मार्केटयार्ड, पुणे मधील हमाल कामगारांनी माथाडी मंडळास दिले निवेदन
पुणे माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळ, पुणे मार्केट येथे दि.१२ मार्च २१ रोजी माथाडी कामगारांनी फंडाच्या मिळाव्यात म्हणून माथाडी मंडळाचे अधिकारी श्री मते यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात आले.
कामगार माथाडी मंडळास दर महिना पगार भरणा देत असतो यातील ३५% लेव्हि मंडळ कपात करून उरलेली रक्कम माथाडी कामगारास पगार स्वरूपात देत असते. तरी देखील गेली ३ वर्षांपासून कामगारांना मंडळाकडून फंड पावती देण्यात येत नाहीत. गेली ३ वर्षांपासून प्रिंटर चालत नाही, कागद उपलब्ध नाही अशी वेगवेगळी कारणे देऊन फंड पावती दिली जात नाही अशी तक्रार कामगारांनी केली. फंड पावत्या लवकर उपलब्ध करून देण्यात आल्या नाही तर माथाडी मंडळासमोर उपोषण करण्याचा इशारा यावेळी कामगारांनी दिला आहे.
निवेदन देण्यासाठी मार्केटयार्ड भुसार भागातील कामगार सोमनाथ पानसरे, निलेश कुटे, जनार्दन नाळे, भागवत भुजबळ, अशोक गिते, महेश शिंदे, किरण भरेकर, स्वप्नील सोनावणे, कोंडीराम बुधवंत, प्रवीण बनसोडे, गजानन चोरगे, संभाजी मरगळे, अमोल काळे, सुनील कचरे, अशोक चौधरी व बहुसंख्य कामगार उपस्थित होते.