पुणे : महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटना .पुणे जिल्हाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्री.समर्थ सेवा मंडळ ट्रस्ट हॉल, शनिवार पेठ पुणे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यातआले.
सुरुवातीस सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस सावित्रिच्या लेकींच्याहस्ते पुष्प हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. श्री.दत्तात्रय तथा भगवानराव देशपांडे अध्यक्ष श्री समर्थ मंडळ यांनी सावित्रीच्या लेकींना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास आदर्श पुणेकर या संघटनेचे अध्यक्ष,मा.श्री.प्रदिप ईथापे, मीना पंडीत,स्मिता कोरडे,सुवर्णा कोंढाळकर, शरद पंडीत प्रदेश पदाधिकारी, उषा जाधव अध्यक्ष पुणे जिल्हा, सुनिता बढे, शिला आटपाळकर, माधवी पवार, मिनाज शेख,वर्षा ताडे,सुजाता गुंजाळ, संध्या आदावडे,वर्षा ठक्कर,रंजना दिघे,या कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती.