पुणे : सन २०२१-२०२२ च्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात श्री.अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी घरेलु काम करणाऱ्या महिलांसाठी "संत जनाबाई सामाजिक सुरक्षा योजना", जाहिर करुन २५० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली. या मुळे सर्वसामान्य गरीब,घरेलू महिला कामगारांना कल्याणकारी सुविधा, मुलांकरिता शैक्षणिक योजना, आरोग्य योजनांचा लाभ मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. अशी माहिती महाराष्ट्र असंघटित कामगार संघटनेने व्यक्त केले.
दि.८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने २०१४ पासुन आत्तापर्यंत शासकीय योजनापासुन दुर्लक्षित राहिलेल्या घरेलु कामगार महिलांना शासनाच्या वतीने भेट दिली. त्या बद्दल मा.श्री.उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री, मा.श्री.अजितदादा पवार उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री, मा.श्री.दिलीप वळसे पाटील कामगार मंत्री, मा.यशोमतिताई ठाकुर महिला व बाल विकास मंत्री, मा.श्री.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू साहेब कामगार राज्यमंत्री, मा.आ.विद्याताई चव्हाण विधानपरिषद यांचे राज्यातील लाखो घरेलु कामगार महिलांच्या वतीने हार्दिक आभार संघटनेच्या वतीने अध्यक्ष गणेश भोसले, सरचिटणीस शरद पंडित यांनी व्यक्त केले आहे.
घरेलु कामगार मंडळ पुनर्जीवित करुन कामगार कल्याणकारी विविध योजनासाठी लाभां करिता तरतूद करण्याच्या मागणीचा मंत्री महोदयांच्याकडे सतत पाठपुरावा केला त्यास आज काही प्रमाणात यश मिळाले आहे असे मत संघटनेने व्यक्त केले.