रांजणगाव midc मध्ये सुरु झाली कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) शाखा, हजारो कामगारांना होणार फायदा

रांजणगाव, पुणे : रांजणगाव औदयोगिक क्षेत्र (MIDC) येथे भारत सरकारच्या कामगार मंत्रालयाचे कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) शाखेची सुरुवात करण्यात आली. या कार्यालयामुळे रांजणगाव, शिक्रापूर, शिरूर परिसरातील नोंदणीकृत लाखो कामगारांना याचा फायदा होणार आहे.

    पूर्वी रांजणगाव, शिरूर, शिक्रापूर भागातील कामगारांना ESIC चा लाभ, क्लेम करण्यासाठी येरवडा ऑफिस येथे जावे लागत होते. रांजणगाव परिसरातील कामगार प्रतिनिधी व मालक यांच्या विनंतीमुळे सदर प्रस्ताव सादर केल्यानंतर ESIC मुख्य शाखा यांनी याला मान्यता देऊन रांजणगाव MIDC येथे ESIC शाखा सुरवात करण्यात मान्यता दिली. 

      त्यानुसार रांजणगाव येथे दिनांक ८ मार्च २०२१ रोजी ESIC यांच्या २३व्या शाखा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं आहे. ESIC उपक्षेत्र कार्यालय पुण्याचे उपसंचालक (प्रभारी) हेमंत कुमार पांडेय यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी डेक्कन इंडस्ट्री कॉमर्स अँड ऍग्रीकल्चर अध्यक्ष प्रकाश धोका, ITC प्लांट हेड मलाय सहा, ESIC अधिकारी चंद्रशेखर पाटील व पदाधिकारी उपस्थित होते. 

       उदघाटन प्रसंगी हेमंत कुमार पांडेय यांनी सांगितले कि ESIC बेनिफिट मिळवताना काही समस्या आल्यास dir-pune@esic.nic.in यावरती ई-मेल करावा. 

ESIC ब्रांच पत्ता : 

नगर-पुणे रोड, रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन समोर, कारेगाव, तालुका-शिरूर, जिल्हा-पुणे ४१२२१०