राज्याच्या बजेटमध्ये कामगार

मुंबई : महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारने दुसरा अर्थसंकल्प सादर केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा सन २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर केला.

सन २०२१-२२ चा अर्थसंकल्पमध्ये कामगार (Workers) वर्गासाठी  - 

  • संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजनेतून घरकाम करणाऱ्या महिला यांची नोंदणी व सामाजिक सुरक्षा व कल्याणासाठी “समर्पित कल्याण निधी” निर्माण करणे, त्यासाठी बीजभांडवल म्हणून २५० कोटी रुपये जाहीर. जमा होणा-या एकूण निधीतून घरकाम करणा-या महिलांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येतील.

  • स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाला कल्याणकारी योजना राबविण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा यासाठी साखर कारखान्यांकडून ऊस गाळपानुसार प्रतिटन १० रुपये आकारुन प्राप्त होणाऱ्या निधीच्या समप्रमाणात राज्य शासन दरवर्षी अनुदान देईल.