पुणे : सणसवाडी येथील आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील कंपनी कामगार संघटना व आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील कंपनी यांच्या मध्ये वेतनवाढ करार संपन्न झाला.
सदर करार ३ वर्षांकरिता करण्यात आला असून दि.१ ऑक्टोबर २०१९ ते दि.३० सप्टेंबर २०२२ करीत लागू राहणार आहे. करार नुसार १५ वर्ष काम करणाऱ्या कामगारांना रु.१३,७५०/- व १५ वर्ष खालील कामगारांना १३,२५०/- पगार वाढ करण्यात आली. ग्रेडनुसार वार्षिक इन्क्रिमेंट कमीत कमी ३५०/- जास्तीत जास्त ६००/-, मेडिक्लेम सुविधा ३,५०,०००/- यामध्ये पती,पत्नी,२ मुले करण्यात आली.
याचबरोबर एकूण सुट्या PL - २४, SL - ६, CL - ७ करण्यात आल्या. अटेन्डन्स बोनस स्कीम, कँटीन सुविधा, ओव्हर टाइम डबल रेट, मृत्यू-अपंगत्व फंड चालू करण्यात आला.
करारासाठी मार्गदर्शन राष्ट्रीय एकता महासंघ अध्यक्ष किशोर ढोकले, उपाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य राजूअण्णा दरेकर, रमेश सातपुते, गणेश जाधव, अविनाश वाडेकर यांनी केले. कामगार प्रतिनिधी म्हणून राजू दरेकर, कैलास मुंगसे, नवनाथ गव्हाणे, नवनाथ यलभर, घाऊसो रोकडे, संतोष शिंदे, माणिक दरेकर, अशोक वायकर, दत्तात्रय परांडे कंपनी व्यवस्थापन तर्फे श्रीधरन (सीईओ), सुधीर शिंदे (सीईओ), मुकुंद जागीरदार (एच.आर हेड), सिंघानिय (फायनान्स), राजेश राजपूत (प्लांट हेड), सूर्यवंशी, दिपक निकुंभ (एच.आर) उपस्थित होते.
करार संपन्न झाल्यानंतर कामगार प्रतिनिधी निवडणूक पार पडली यामध्ये सन २०२१-२४ करिता राजू दरेकर अध्यक्ष, नवनाथ गव्हाणे उपाध्यक्ष, संजय नायकवडी सचिव, पाटीलबुवा गव्हाणे उपसचिव, माणिक दरेकर खजिनदार, योगेश कंद उपखजिनदार, सदस्यपदी बाळासाहेब नांदगुडे, नवनाथ यलभर, अनिल पाटील, राजगोपाल नडार यांची निवड झाली.