नवीन कामगार संहितेचा (New Labour Code) निषेध करणार कामगार संघटना

केंद्र सरकारने तयार केलेल्या चार नवीन कामगार संहिता (four new labour codes) विरोधात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (CITU) यांच्यासह सिंगारनी कोलियरीज एम्प्लॉईज युनियन (SCEU) आणि त्याच्याशी संलग्न संघटना १ एप्रिल रोजी विविध जिल्ह्यातील औद्योगिक पट्ट्यात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यास तयार आहेत अशी माहिती द हिंदू वृत्तसंस्थेने दिली

चार नवीन कामगार संहिता रद्द करण्यासाठी दबाव आणण्यासाठी एससीईयूने १ एप्रिल रोजी कोथागुडेम मधील राज्य-मालकीच्या सिंगारेनी कोलियरीज कंपनी लिमिटेड (SCCL) च्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शनाची योजना आखली आहे. प्रमुख केंद्रीय कामगार संघटनांशी संबंधित इतर अनेक संघटनांनीही त्याच दिवशी कोठागुडेम-पलवंचा औद्योगिक पट्ट्यात विविध ठिकाणी निदर्शने करण्यासाठी अशीच योजना आखल्याची माहिती देण्यात आली.

SCEU चे सरचिटणीस एम. नरसिम्हा राव यांनी आरोप केला आहे की,  २९ केंद्रीय कामगार कायद्यांची जागी चार कामगार संहिता मध्ये रूपांतर करणे म्हणजे “कामगारविरोधी” आणि “कॉर्पोरेट समर्थक” पाऊल आहे. ते पुढे म्हणाले की कामगार वर्गाने लढून जिंकलेले हक्क यामुळे धोक्यात येणार असून कामगार संघटनेच्या चळवळीचा प्रभाव कमी करेल. SCEU गुरुवारी कोळसा पट्ट्यातील प्रदेशभर आंदोलन करणार असून या चार कामगार संहिता रद्द करण्याची मागणी केली जात आहे.