मुंबई : महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या प्रश्नांबाबत समिती स्थापन करणेबाबत शासनाने दि.४ मार्च २०२१ रोजी शासन निर्णय प्रसारित केला असून साखर कारखान्यातील कामगारांच्या वेतन व सेवा-शर्ती याबाबत दिनांक १२ नोव्हेंबर २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये गठीत त्रिपक्षीय समितीस व शासनास शिफारस करणे / उपाययोजना सुचविण्याबाबत समिती गठीत करण्यात आली आहे. हि समिती तीन महिन्यात अहवाल सदर करेल.
समिती सदस्य -
साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे.
कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई
व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि. मुंबई
सदस्य सचिव -
कामगार उपायुक्त (औ.सं.), मुंबई
महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या प्रश्नांबाबत समिती स्थापन करणेबाबत शासन निर्णय दि.४ मार्च २०२१