सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सांगली येथे वेतनवाढ करार संपन्न

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सांगली आणि को.ऑप.बँक एम्प्लॉईज युनियन, सांगली यांचा कर्मचारी वेतनवाढ करार संपन्न झाला.

    सदर करार दिनांक १ एप्रिल २०१९ पासून ते दि.३१ मार्च २०२३ पर्यंत आहे. करारानुसार सरासरी रुपये ४,०००/- इतकी वेतनवाढ करण्यात आली. रजाकालीन प्रवासात सवलत (L.T.C.) श्रेणी निहाय रुपये ४,०००/- ते रुपये ७,०००/- दरवर्षी मिळणार आहे. एखादा कर्मचारी बँकेच्या सेवेत असताना मृत झाला तर सर्व कर्मचाऱ्यांचा एका दिवसाचा पगाराची रक्कम कपात करून ती सर्व रक्कम मृत कर्मचार्‍याच्या वारसास देण्याची तरतूद करण्यात आली. धुलाई भत्ता (washing allowance) रुपये १५०/- करण्यात आला. घर कर्जासाठी रु.३० लाख मर्यादा ६% व्याजाने मिळणार आहे. आजारपणाच्या (sick leave) व किरकोळ रजा (casual leave) च्या मर्यादेमध्ये प्रत्येकी २ रजा वाढविण्यात आल्या. शिल्लक रजेचे रोखीकरण करण्यात येणार आहे याशिवाय हक्काच्या रजेची मर्यादा आत्ता २४० पर्यंत वाढविण्यात आली. सदर करार दिनांक १ एप्रिल २०१९ पासून मिळणार असून वाढीव पगाराचा फरक देण्यात येणार आहे. 

     सदर करारासाठी युनियन अध्यक्ष आनंदराव अडसूळ, युनियन कार्याध्यक्ष नरेंद्र सावंत, सल्लागार डि.के. काका, संजू साळवी यांंनी सहकार्य केले.

   बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी कडू, सरव्यवस्थापक सर्वश्री रामदुर्ग, जे.जे.पाटील व प्रशासन विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य केले.

     युनिटचे संघटक सचिव डोंबाळे, सहसंघटक सचिव संभाजी पाटील, कमिटी सदस्य, युनियन कार्यकर्ते यांनी सहकार्य केले, अशी माहिती युनियन सरचिटणीस प्रदीप पाटील यांनी दिली.