भारतीय मजदूर संघाची पेन्शन वाढी करिता PF कार्यालय पुणे येथे धरणा
पुणे : EPF ९५ पेन्शन योजनातील पेन्शन रक्कम वाढ होण्याकरिता समिती स्थापन करण्याची व समिती चा अहवाल येई पर्यंत किमान रू.५०००/- व महागाई भत्ता देण्याची मागणी भारतीय मजदूर संघानी केली आहे. या वेळी भारतीय मजदूर संघाने भविष्य निर्वाह निधी कार्यालय पुणे येथे धरणा आंदोलन करून निवेदन दिले आहे.
दि.१ जानेवारी २००४ पासून नवीन पेन्शन सिस्टीम NPS लागु केली. या मध्ये १० % रक्कम कामगार व सरकारचे अंशदान असायचे. या २० % अंशदान च्या ६० % रक्कम सेवानिवृत्त नंतर कामगारांना मिळेल व बाकी रकमेतून बाजारमुल्या नुसार पेन्शन मिळेल अशी तरतूद आहे. नुकतेच सरकारने ४ % अंशदान वाढवून १४ % केलं आहे. १९९५ पेन्शन योजना नुसार किमान पेन्शन रु.१०००/- रू केली आहे. असंघटीत कामगारक्षेत्र करिता ६० वर्ष पेक्षा जास्त झालेल्या कामगारांना किमान पेन्शन रु.३०००/- केली आहे. वृध्दापकाळात ही रक्कम अतिशय कमी असते. त्यामुळे भारतीय मजदूर संघ ने मागणी केली आहे की कामगारांच्या शेवटच्या पगाराच्या ५० %रक्कम पेन्शन म्हणून दरमहा देण्यात यावे.
भारतीय मजदूर संघाची महत्वपूर्ण मागण्या
- १) पेन्शन वाढ व सुधारणा करिता त्रिपक्षीय समिती स्थापन करण्यात यावी. अहवाल प्राप्त होई पर्यंत किमान रु.५०००/- व महागाई भत्ता मिळावा.
- २) सर्व पेन्शन योजनामध्ये सरकार चे अंशदान सारखं असावे
- 3) पेन्शन योजनांना बदलता महागाई भत्ता लागु करावा.
- ४) सर्व कामगारांना त्यांच्या शेवटचा वेतन च्या ५०% रक्कम सेवानिवृत्त नंतर मिळावी.
- ५) सरकारी कर्मचारी ना जुन्या पेन्शन योजना लागु करण्यात यावी.
- ६) बॅक,विमा अन्य कर्मचारी पेन्शन योजनांचा वेळोवेळी पुनःनिर्धारण करण्यात यावे.
- ७) असंघटीत कामगारांना करिता चांगली पेन्शन योजना करण्यात यावी.
- ८) सामाजिक सुरक्षा मुलभुत अधिकारात समाविष्ट करून पेन्शन योजना करण्यात यावी.
यावेळी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा यांच्या मागण्यांचे निवेदन अरूण कुमार रिजनल कमिशनर १, भविष्य निर्वाह निधी कार्यालय पुणे यांना देण्यात आले. यावेळी चिटणीस जालिंदर कांबळे, अर्जुन चव्हाण, उमेश विस्वाद, विवेक ठकार, अजेंद्र जोशी, वासंती तुम्मा, विजयालक्ष्मी येमुल सहभागी झाले होते.