पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील 'फ' क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत मोरेवस्ती येथील कचरा संकलन रॅम्प येथे कामगारांनी 'काम बंद' आंदोलन केले. कोरोना काळातही जिवाची पर्वा न करता शहरातील कचरा संकलित केल्यानंतरही ठेकेदार कंपनीने किमान वेतनदरानुसार तसेच वेळेवर पगार देत नाही, पगार स्लिप देत नाही असा आरोप करत या कामगारांनी काम बंद करून शनिवारी ( ता.१३ ) निषेध केला.
यावेळी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकार पुरस्कृत योजनेची अंमलबजावणी पिंपरी चिंचवड महापालिकामध्ये राबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली तसेच सर्व कर्मचाऱ्यांना व्यक्तिगत संरक्षण कीट देण्याची मागणी केली. सफाई कर्मचारी व वाहन चालक यांचे किमान वेतनाप्रमाणे पगार द्यावा. प्रलंबित एक रकमी फरक द्यावा. कामगारांना प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार द्यावा तसेच येत्या १५ दिवसात कोनत्याही प्रकारची कारवाई न झाल्यास बेमुदत आंदोलन करण्यात येईल.अशा मागण्या यावेळी सर्व सर्व कर्मचाऱ्यांनी मांडले.
यावेळी कामगार संघर्ष संघटनेचे सनी पवार, वाहनचालक बाबु संगोळकर,प्रविण जोगदंड, लक्ष्मन साळवे,अतुल क्षिरसागर , गणेश नागवडे, शांती गवळी, सरस्वती गुजलोर,विजय इंगळे,राजू खैरे, सुनीता डाके, विक्की चव्हाण,अन्नपूर्णा भाहाड,संगीता गाडीवडार, विजयामाला साळवे,सुरेखा वाघमारे उपस्थित होते.