नगर : नगर औद्योगिक वसाहतीमधील इटन कंपनी, नगर मधील कामगारांना १६,७५८/- रुपयांची वेतन वाढ जाहीर केली आहे. अहमदनगर जिल्हा कामगार संघटना आणि इटन कंपनी, नगर व्यवस्थापन यांच्या दरम्यान करार करण्यात आला.
सदर करार कालावधी दि.१ जुलै २०१९ ते ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत. याप्रमाणे १६,७५८/- रुपयांची वेतन वाढ टप्याटप्याने देणार आहे त्याचबरोबर मेडिकल इन्शुरन्स ३ लाख, दिवाळी बोनस २५ हजार रुपये याच बरोबर २०१८-१९ मधील वाढीव बोनस म्हणून १ हजार रुपये मिळवून देण्यात आले. तसेच कामगारांना २७ सुट्यावरून ३५ सुट्टी करण्यात आल्या. कामगारांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास १५ लाख रुपये व संघटनेच्या सर्व सभासदांचा एक दिवसाचा पगार कुटुंबियांना देण्यात येईल.
यावेळी अहमदनगर मनपा विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर, संघटना अध्यक्ष संतोष लांडे, नगरसेवक डॉ.सागर बोरुडे, कंपनी व्यवस्थापनचे वराड राजन बालचंद्रन, प्रसन्न आपटे, भूपेंद्र सिंग, राजेश पैवाल, कामगार प्रतिनिधी वैभव पादीर, महेश चेडे, गौतम मेटे, वैभव तोडमल, कासीम शेख, श्रीकृष्ण थोरात, हरिकृष्ण ढेरे संघटनेचे पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.