घरेलु कामगार कल्याण मंडळास अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करा

सातारा येथे महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटना जिल्हा कार्यालय उदघाटन 

सातारा : महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटनेच्या ,सातारा जिल्हा कार्यालयाचा उदघाटन श्री.चंद्रकांत राजाराम कदम ,सातारा जिल्हा बँक कर्मचारी पतसंस्था माजी चेअरमन तसेच बँक कर्मचारी संघटना, सचिव व सौ.मीना पंडीत, प्रदेश उपाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले.

     यावेळी बोलताना संघटना प्रदेश सरचिटणीस शरद पंडित म्हणाले कि, महाराष्ट्र राज्यात घरेलू कामगार क्षेत्रात प्रामुख्याने महिलां मोठ्या प्रमाणावर काम करतात. महाराष्ट्रात लाखो महिला कामगार विविध जिल्हा,तालुका व शहराच्या ठिकाणी काम करतात. शासनाचे घरेलु कामगार मंडळ सध्या बंद स्थितीत असून ते पुनर्जीवित करुन शासकीय योजनां पासुन वंचित राहिलेल्या घरेलु कामगारांना त्यांचे न्याय मिळवून देण्यासाठी घरेलु कामगार कल्याण मंडळास अर्थसंकल्पात पाचशे कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतूद करण्यात यावी अशी मागणी केली.

               या कार्यक्रमास श्री.शरद पंडीत, प्रदेश सरचिटणीस व श्री.राजकुमार सुतार प्रदेश सहसचिव, शशिकला कर्वे जिल्हा अध्यक्ष, श्री.रविंद्र गुप्ते जिल्हा सचिव, बागाव तालुका अध्यक्ष, श्री.रामचंद्र जगताप  तालुका उपाध्यक्ष, श्री.निलेश बनकर तालुका सचिव हे उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.प्रीतम सुतार यांनी विशेष प्रयत्न केले.