चाकण : चाकण औद्योगिक वसाहतीमधील शिंडलर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मधील कामगारांना १७,१११/- रुपयांची वेतन वाढ जाहीर केली आहे. शिंडलर इंडिया एम्प्लॉईज युनियन आणि शिंडलर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व्यवस्थापन यांच्या दरम्यान करार करण्यात आला. कंपनीतील ९७ कामगारांना या वेतन वाढीचा फायदा मिळणार आहे.
हा करार १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२३ साठी असणार आहे. वेतन वाढ कराराप्रमाणे प्रत्येक कामगाराला
१) पहिल्या वर्षी - १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ साठी ५०,००० (लमसम अमाउंट)
२) दुसऱ्या वर्षी - ११,१११/-
३) तिसऱ्या वर्षी - ६,०००/- रुपये
याप्रमाणे वेतन वाढ मिळणार आहे. तसेच कामगार त्यांची दोन मुले आणि पत्नी यांच्यासाठी तीन लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी सुविधा तसेच २० लाख रुपयांचा ग्रुप मेडिक्लेम ची सुविधा पूर्ववत मिळणार आहे.
तसेच कामगारांना रजादान योजना, तसेच ज्या कामगारांना कामावर ये-जा करण्यासाठी कंपनीच्या बस सेवेचा वापर करता येणार नाही अशा कामगारांना पेट्रोल भत्ता अशा नवीन सुविधांचा लाभ मिळणार आहे.कामगारांना वर्षातून एक सहल, स्नेहसंमेलन, वार्षिक स्पोर्ट ऍक्टिव्हिटीचा पूर्ववत लाभ मिळणार आहे.
सध्याच्या काळात भरघोस पगार वाढ झाल्याने कामगारांनी आनंद व्यक्त करत स्वागत केले. करारावर संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष निलेश तानकर,उपाध्यक्ष वैभव पोवार, जनरल सेक्रेटरी प्रवीण कांबळे, जॉईंट सेक्रेटरी चंदन कुरले, खजिनदार पवन चव्हाण, स्वप्नील लामकाने व सोमनाथ दांगट यांनी स्वाक्षरी केली. कंपनी च्या वतीने श्री शुभंकर चॅटर्जी (सी एस सी ओ), योगेश चव्हाण (एच आर हेड), प्रदीप कुमार शंकरण (व्हॉइस प्रेसिडेंट), कुलबीर सिंग, प्रीतम शिंपी, किरण थोरवत, वैभव लाड, तुकाराम फाले, विजय नायर, संकेत ढगे, पूनम जाधव व इतर मान्यवर यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
हा करार संपन्न करण्यासाठी श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष दिलीप पवार, जनरल सेक्रेटरी मनोज पाटील, रोहित पवार, तसेच श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार मारूतीराव जगदाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.