देशामध्ये कामगारांचे होणार पाच भागामध्ये सर्वेक्षण

अखिल भारतीय सर्वेक्षणांसाठी सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन्स आणि पाच प्रश्नावलीसह सूचना पुस्तिकांचे  केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री  गंगवार यांच्या हस्ते होणार विमोचन

केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) संतोषकुमार गंगवार चंदिगडमध्ये कामगार ब्युरोमार्फत आयोजित केलेल्या पाच अखिल भारतीय सर्वेक्षणांसाठी सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन्स आणि प्रश्नावलीसह सूचना पुस्तिका प्रकाशित करतील.

कामगार ब्युरो खालील पाच सर्वेक्षण करत आहे

• अखिल भारतीय स्थलांतरित कामगार सर्वेक्षण,

• अखिल भारतीय घरगुती कामगार सर्वेक्षण,

• व्यावसायिकांनी निर्माण केलेल्या रोजगार याबाबतचे  अखिल भारतीय सर्वेक्षण,

• वाहतूक क्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या रोजगाराबाबतचे अखिल भारतीय सर्वेक्षण आणि

• आस्थापनांच्यातिमाही अहवालावर आधारित रोजगारविषयक  अखिल भारतीय सर्वेक्षण.

देशातील प्रमुख राज्ये आणि संपूर्ण देशातील कामगार वर्गापैकी  घरगुती कामगारांच्या संख्येचा  अंदाज घेणे आणि त्यांच्या नियुक्तीसाठी वापरलेल्या सामाजिक -लोकसंख्याशास्त्रीय मुख्य वैशिष्ट्यांच्या आधारे  या घरगुती कामगार / कुटुंबाची टक्केवारी  शोधणे हे अखिल भारतीय घरगुती कामगार सर्वेक्षण करण्याचे उद्दीष्ट आहे.

भारतातील स्थलांतरित कामगारांची संख्या आणि त्यांचे राहणीमान, कामकाजाची परिस्थिती आणि इतर सामाजिक-आर्थिक परिस्थितीची माहिती एकत्रित करणे हे स्थलांतरित कामगारांच्या सर्वेक्षणामागील उद्दिष्ट आहे.

व्यावसायिकांनी निर्माण केलेल्या रोजगाराबाबत  अखिल भारतीय सर्वेक्षणातील मुख्य दोन उद्दीष्टे खालीलप्रमाणेआहेत (i) देशातील सक्रिय व्यावसायिकांची एकूण संख्या मोजणे आणि (ii) या व्यावसायिकांकडून उपलब्ध झालेल्या  रोजगाराची माहिती घेणे.

भारतातील वाहतूक क्षेत्रात निर्माण झालेल्या रोजगाराचे मूल्यांकन करणे हे वाहतूक क्षेत्रातील रोजगाराच्या सर्वेक्षणातील उद्दीष्ट आहे.

आस्थापनाच्या तिमाही अहवालावर  आधारित रोजगाराबाबत अखिल भारतीय सर्वेक्षणांचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेच्या कृषेतर ८ महत्त्वाच्या गाभा  क्षेत्रांचा समावेश असलेल्या सलग तिमाहींमध्ये रोजगाराच्या परिस्थितीत होणार्या  सापेक्ष बदलांचे मोजमाप करणे.

अहवाल तयार करण्यासाठी संपूर्ण माहिती संकलन करण्यासाठी  माहिती तंत्रज्ञानाचा (आयटी) वापर करण्याचा  ब्युरोने घेतलेला निर्णय माहिती संकलन ते अहवाल तयार होण्याच्या सर्व टप्प्यांसाठी  महत्त्वपूर्ण ठरणार  आहे.