नाशिक : अंबड येथील सुदाल इंडस्ट्रीज लि.अंबड येथे वेतनवाढ करार संपन्न झाला. दि. २७ जानेवारी २०२१ रोजी करारावर सह्या करण्यात आल्या. सी.आय.टी.यु चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.डी. एल. कराड व कंपनीचे डायरेक्टर श्री. शंतनू चोखाणी यांच्यात सकारात्मक चर्चा होऊन वीस ( २० ) कामगार कायम करणे व रुपये सहा हजार ( ६०००/- ) पगारवाढीवर एक मत झाले.
दि.१ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२३ पर्यंतचा पगारवाढीचा कालावधी राहणार असून बेसिक मध्ये ४०℅ व अलाउन्सेस मध्ये ६०% अशी पगारवाढ देण्याचे मान्य केले. त्याच प्रमाणे कामगारांना व्हेरेबल डी. ए देण्यात येईल. तसेच दरवर्षी कामगारांना १४९००/- बोनस देण्यात येईल. एप्रिल २०२१ पासून २० कामगार कायम करण्यात येतील.
या पगारवाढीच्या सह्या करताना सी.आय.टी.यु. चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष नाशिक वर्कर्स युनियनचे अध्यक्ष कॉ.डॉ.डी. एल.कराड माजी नगरसेवक अँड.तान्हाजी आप्पा जायभावे, नाशिक वर्कर्स युनियनचे उपाध्यक्ष कॉ.तुकाराम सोनजे, नाशिक वर्कर्स युनियनचे सेक्रेटरी कॉ.सतीश खैरनार तसेच कंपनी व्यवस्थापनातर्फे कमर्शियल मॅनेजर श्री.के.एन. दुल्हा व पर्सनल मॅनेजर श्री. मंगेश जगताप ,कमिटी मेम्बर कॉ.बाबासाहेब पोपट वावधाने, कॉ.रमेश पंडित शेवाळे, कॉ.विशाल दत्तात्रय सूर्यवंशी, कॉ.दत्तू शंकर पोळ, कॉ. सूर्यकांत नारायण मोरे, कॉ. प्रदीप शामराव देसले,कॉ. जगदिश सिंग राठोड यांनी सदर करारावर सह्या केल्या. कराराची प्रत एकमेकांना देवून व पेढे वाटून कामगारांनी आनंद उत्सव साजरा केला.
सध्याच्या कठीण काळात सीटू प्रणित नाशिक वर्कर्स युनियनने वेतनवाढीचा करार करून औद्योगिक जगतात आनंदाचे वातावरण निर्माण केले आहे.