रांजणगाव येथील महाराष्ट्र एन्व्हायरो कंपनी कामगारांच्या थकीत बोनस रक्कम वसुली बाबत होणार कारवाई

पुणे : रांजणगाव एमआयडीसी येथील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लि. या कंपनीने करारातील तरतुदीनुसार आपल्या कामगारांना बोनसची रक्कम गेली तीन वर्ष दिली नाही त्याविरुद्ध महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर कामगार संघटनेच्या वतीने मा.साहाय्यक कामगार आयुक्त यांचेकडे औद्योगिक विवाद अधिनियम, १९४७ चे कलम-३३-सी-(१) च्या तरतुदीनुसार थकीत बोनसच्या रकमेची वसुली करण्याबाबत तक्रार दाखल केली होती.

        संघटनेच्या सदर तक्रारीच्या अनुषंगाने थकीत बोनसची रक्कम रुपये १५,४२,६८४/- (पंधरा लाख बेचाळीस हजार सहाशे चौ-याऐंशी रुपये) वसूल करून सदर रक्कम मा.अप्पर कामगार आयुक्त, पुणे विभागाकडे जमा करण्याबाबत मा.सहाय्यक कामगार आयुक्त यांनी मा.जिल्हाधिकारी, पुणे यांना दिनांक ११ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रमाणपत्र सादर करून कार्यवाही लवकरात लवकर करण्याची विनंती केली आहे.

        सदर प्रकरणी श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष दिलीपराव पवार, जनरल सेक्रेटरी मनोज पाटील व इतर सर्व पदाधिकारी यांनी वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य केले. संघटनेच्यावतीने सल्लागार म्हणून मारुती जगदाळे यांनी काम पाहिले अशी माहिती कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आली.

मा.सहाय्यक कामगार आयुक्तांनी मा. जिल्हाधिकारी,पुणे यांना दिलेले दिनांक ११ फेब्रुवारी २०२१ रोजीचे पत्र व प्रमाणपत्राची प्रत खालील प्रमाणे -