कोल्हापूर : वंदूर, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी १४ वेठबिगार कामगारांची मुक्तता करण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे -
वंदूर, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी १४ ते १५ ऊसतोड मजूर यांना बंदी बनवून ठेवण्यात आले अशी माहिती जिल्हाधिकारी, जिल्हा दमोह, मध्य प्रदेश यांचे कडील दिनांक ३०.०१.२०२१ रोजीचे पत्रानुसार कळविण्यात आले होते.
त्याबाबत वेठबिगार अधिनियमांतर्गत कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कोल्हापूर व कामगार उपायुक्त, ग्रामीण विभाग, मुंबई यांनी दिले. त्यास अनुसरून श्री. शैलेंद्र पोळ, अपर कामगार आयुक्त, पुणे व श्री. राम हरी भोसले, उपविभागीय अधिकारी, कागल- राधानगरी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक कामगार आयुक्त श्री. संदेश आयरे, श्री. राहुल तोडकर, सरकारी कामगार अधिकारी, श्री. यशवंत हुंबे, सरकारी कामगार अधिकारी तसेच श्री. गोरख थोरवत, दुकाने निरीक्षक यांचे पथकाने कागल तहसीलदार व कागल पोलीस यांच्यासमवेत तक्रारीच्या ठिकाणी जाऊन आठ पुरुष व सहा महिला तसेच त्यांच्या सोबत असणारे पाच लहान मुले यांना कामातून मुक्त करून मध्य प्रदेश येथील येथून आलेल्या कामगार विभाग व स्वयंसेवी संस्था यांच्या पथकाच्या ताब्यामध्ये आले. सदर बाबत कागल पोलीस स्टेशन, कागल या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.