मुंबई : कामगार आयुक्त कार्यालय वांद्रे-कुर्ला संकुल मुंबई येथे कामगार आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विविध कामगार संघटना प्रतिनिधी यांची नवीन कामगार संहिता (New Labour Code) बाबत सोमवारी (दि.२२ फेब्रुवारी ) बैठक पार पडली.
यावेळी, केंद्र सरकारने कामगार कायदे चे चार संहिता (New Labour Code) मध्ये रूपांतर केले महाराष्ट्र सरकार ने या नवीन कामगार कायद्यामध्ये काय बदल करावे या विषयी कामगार आयुक्त यांच्या बरोबर महाराष्ट्र कामगार संघटना संयुक्त कृती समितीची बैठक झाली. या बैठकीत कृती समिती तर्फे सरकारला अनेक सुचना करण्यात आले तसेच कामगार हिताचे अनेक सुधारणा सुचविण्यात आल्या व निवेदन देण्यात आले.
यावेळी कामगार आयुक्त शिरिन लोखंडे, रविराज येळवे, दहिफळकर, प्रदिप पवार, महाराष्ट्र कामगार संघटना संयुक्त कृती समिती तर्फे काॅम्रेड अॅड.संजय सिंघवी, डाॅ.डी एल कराड, संजय वढावकर, विश्वास उटगी, खासदार अरविंद सावंत, एम ए पाटिल, श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष दिलीप पवार उपस्थित होते.