पुण्यात कंपनीच्या कामगारविरोधी धोरणामुळे मनसेचे "खळखट्याक" आंदोलन

पुणे : फ्रेसेनियस काबी या कंपनीतील कामगारांना कामावरून काढण्यात आले या विषयी तक्रारी मनसे कामगार सेनेकडे आल्या होत्या. याबाबत मनसेने कंपनी कडे विचारणा केली मात्र कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मनसेने कंपनी कार्यालयाची तोडफोड करत 'खळखट्याक' आंदोलन केले.

     रांजणगाव एमआयडीसी परिसरात ही कंपनी आहे. या कंपनीचे कार्यालय येरवडा परिसरात असून या कंपनीत काम करणारे काही कामगार हे मनसेचे सदस्य आहेत. कंपनीने बेकायदेशीररित्या कामगारांना कामावरून कमी करणे, कामगारांना पगार वाढणार न करणे. कामगारांवर अन्याय करणे, संघटनेला चर्चेला वेळ न देणे, संघटनेचा नाम फलक लावण्यास विरोध करणे, असे आरोप मनसेने कंपनीवर केले आहे.

         या प्रकरणी रुपाली- पाटील ठोंबरे म्हणाल्या, 'फ्रेसेनियस काबी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याच्या तक्रारी मनसे कामगार सेनेकडे आल्या होत्या. त्यानंतर सचिन गोळे यांनी काही दिवसांपूर्वी कंपनीला त्याबाबत विचारणा केली. गोळे आणि सहकाऱ्यांनी चर्चेसाठीही तयार असल्याचे कंपनीला निवेदन देखील दिले होते. मात्र, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना हाताशी घेऊन कामगारांना कामावरून काढून टाकत आणि मनसे कामगार सेनेसोबतही चर्चा नाकारली.'

    या कंपनीच्या कामगार विरोधी धोरणामुळे मनसेने कंपनी कार्यालयाची तोडफोड करत 'खळखट्याक' आंदोलन केले असे मनसे कडून सांगण्यात आले.