'निम' व 'नॅशनल अप्रेन्टिसशिप' यांसारखी धोरणे देशातील तरुणांसाठी शोषणव्यवस्था ठरली - खासदार डॉ.अमोल कोल्हे

नवी दिल्ली : 'निम' व 'नॅशनल अप्रेन्टिसशिप' यांसारखी धोरणे देशातील तरुणांसाठी शोषणव्यवस्था ठरली आहे.मुलांना नोकरी लागली की त्यांची लग्ने होतात आणि त्यानंतर त्याला कायम करायला नको म्हणून वर्ष-दोन वर्षांत कंपनी ब्रेक देते.यामुळे त्या तरुणांचे भविष्य अंधःकारमय होते. त्यामुळे या तरुणांचा आक्रोश समजून घ्या आणि या धोरणांचा पुनर्विचार करावा अशी मागणी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी लोकसभेत केली.  

       लोकसभा अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बोलताना केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

        केंद्र सरकारने देशातील दोन कोटी तरुणांना दरवर्षी रोजगार देण्याचे एक स्वप्न दाखविले होते.पण रोजगार मिळायचे लांबच राहिले जे हातातलं होतं ते देखील निसटून गेलं अशी स्थिती आहे. हजार जागांसाठी लाखो तरुण अर्ज करतात. चतुर्थश्रेणीच्या जागांसाठी ग्रॅज्युएट-पोस्टग्रॅज्युएट तरुण रांगेत उभे आहेत असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नमूद केले.