सामाजिक सुरक्षेविषयीच्या संहितेचा मसुदा

नवी दिल्ली : सामाजिक सुरक्षाविषयक संहिता, २०२० (२०२० चे ३६) भारतीय राजपत्रात अधिसूचित करण्यात आले आहे. त्यासह, १३.११.२०२० रोजी नियमांचा मसुदा जारी करण्यात आला आणि त्यावर विविध हितसंबंधीयांकडून  सामाजिक सुरक्षाविषयक संहिता, २०२० विविध तरतुदी अंतर्गत प्रसिद्धी पूर्व सूचना व हरकती मागविण्यात आल्या.

        या मंत्रालयाला नियमांच्या मसुद्यावर विविध व्यक्ती, संस्था, कामगार संघटना, ऍप-आधारित वाहतूक कर्मचाऱ्यांच्या महासंघासह नियोक्ता संघटना यांच्याकडून टिप्पण्या प्राप्त झाल्या आहेत. सरकारच्या कायदेपूर्व धोरणानुसार नियम संमत करण्यापूर्वी या सर्व टिप्पण्या विचारात घेतल्या जातील.

     ही माहिती श्रम आणि रोजगार राज्य मंत्री (स्वतंत्र कार्यभार) संतोष कुमार गंगवार यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात्त दिली.