पुणे : भारत फोर्ज लि. मुंढवा, पुणे-३६ मध्ये वेतनवाढ करार दि.०९ फेब्रुवारी २०२१ रोजी संपन्न झाला. सदर वेतनवाढ करार हा संघाचे पदाधिकारी यांच्यावर संघाच्या सभासदांचा असणारा अभूतपूर्व विश्वास व संघहितासाठी काहीही करण्याची तयारी व कंपनीचा कामगारांच्या कौशल्य, गुणवत्ता, शिस्त यावर पूर्ण विश्वास यामुळे १९ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पूर्णतः आनंदी वातावरणात पार पडला. सभेला मा. चेअरमन पदमभूषण डॉ. बाबासाहेब कल्याणी यांनी हजर राहून कामगार,कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.
सदर करार माहे १ जुलै २०१९ ते ३१ जून २०२२ अशी तीन वर्षाकरिता करण्यात आला. तीन वर्षाकरिता कामगारांना एकरकमी वेतनवाढ रु.१४५००/- इतकी झाली आहे .
व्ही डि ए (बदलता महागाई भत्ता) -
कंपनीच्या सेवेमध्ये असणारे कामगारांस पुणे राहणीमान निर्देशंकाच्या ५२२५ अंकाच्या वरील वाढीकरिता प्रतिदिन प्रतिअंकास ०.०९ या दराने बदलता महागाई भत्ता मिळण्यास पात्र राहतील.
उष्णता भत्ता -
प्रत्यक्ष उष्णता भत्ता - प्रतिदिन रु.३०/- देण्यात येईल., अप्रत्यक्ष उष्णता भत्ता-प्रतिदिन रु.२५.९७/- देण्यात येईल.
बाहेरगावी जाण्याचा भत्ता -
कंपनीच्या कामाच्या निमित्ताने बाहेर गावी जाण्याचा प्रवास भत्ता प्रतिदिन रु.६००/- तसेच बिलासहित राहण्याचा भत्ता (२४तास/एक मुक्काम)प्रतिदिन ५,०००/-इतका देण्यात येईल.
एल टी ए -
प्रतिवर्ष रु.६,०००/- इतका देण्यात येईल.
रात्रपाळी भत्ता -
रात्रपाळी भत्ता प्रतिदिन रु.२०/- देण्यात येईल.
भोजन भत्ता -
कॅन्टीन सुविधा घेऊ न शकणारा कामगार भोजन भत्ता प्रतिदिन रु.२००/- देण्यात येईल.
हजेरी बक्षीस योजना -
मासिक हजेरीसाठी दोन दिवसाचा मूळ पगार +महागाई भत्ता एवढी रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येईल.
त्रैमासिक हजेरीसाठी रु.१,७००/- देण्यात येईल. सहामाही रु.१५०१/-.इतका देण्यात येईल.
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया लाभ -
दोन मुलानंतर शस्त्रक्रिया केल्यास रु. ३,०००/-रक्कम दिली जाईल.
इतर केसमध्ये शस्त्रक्रिया केल्यास रु. १,०००/-रक्कम दिली जाईल.
खातेनिहाय सहल भत्ता -
प्रतिवर्ष रु.२,०००/- इतका देण्यात येईल.
बस सुविधा -
सर्व कामगारांना बस सुविधा उपलब्ध राहील तसेच पूर्वीच्या बस सुविधेव्यतिरिक्त दोन बस वाढविण्यात येतील. बससुविधेपोटी दरमहा रु.१००/-कपात करण्यात येईल.
गृहकर्ज योजना -
ज्या कामगारांना सेवेत ५ वर्ष पूर्ण असतील असे प्रतिवर्ष ३० कामगार रु.३,००,०००/-इतके कर्ज मिळण्यास पात्र असतील सदर कर्ज द.सा.द.से. शेकडा ५% दराने देण्यात येईल.
घर बांधणी निधी -
या निधीसाठी व्यवस्थापनाने एकरकमी रु.२०,००,०००/-(वीस लाख रुपये) देण्याचे मान्य केले आहे.
गणवेष -
गणवेषाचे प्रतिवर्षं तीन संच देण्याची वारंवारिता यापुढेही चालू राहील. या सुविधेव्यतिरिक्त प्रतिवर्ष १ टी शर्ट देण्याचेही मान्य केले आहे.
खेळ -
कामगारांसाठी भविष्यामध्ये खेळांना उत्तेजन देण्यामध्ये आपण विशेषत्वाने उत्सुक असून दरवर्षी स्पर्धा भरविल्या जातील व येणारा सर्व खर्च कंपनीतर्फे केला जाईल,असे व्यवस्थापनेने प्रतिपादन केले आहे.
सांस्कृतिक महोत्सव -
कामगारांना तसेच परिवारातील सदस्यांना(पत्नी,अपत्य) सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्तेजन देण्यामध्ये आपण विशेषत्वाने उत्सुक असून दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येईल व त्यासाठी येणारा सर्व खर्च कंपनीतर्फे केला जाईल असे व्यवस्थापनेने प्रतिपादन केले आहे
मरणोत्तर सहाय्य निधी -
एखादा कायमस्वरूपी कामगार मृत पावल्यास कुटुंबीयांस मदत निधी म्हणून प्रत्येकी कामगार रु. २५०/- मदत देण्यात येईल आणि कामगारांची जी रक्कम जमा होईल तेवढीच रक्कम कंपनी देईल असे कंपनीने मान्य केले आहे.
कामगार कल्याण निधी -
ही वर्गणी प्रत्येकी कामगार ८ रुपये दरमहा दराने कपात करून कामगार कल्याण निधीमध्ये जमा केली जाईल.
विवाहासाठी सहाय्य उचल -
कामगाराला स्वतःच्या अथवा मुला मुलीच्या लग्नासाठी रु. १,००,०००/-(एक लाख)देण्यात येईल.
शिष्यवृत्ती योजना -
उच्च शिक्षणासाठी नवीन शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत वार्षिक रु.७,००,०००/-(रु सात लाख) तरतूद करण्याचे मान्य केले आहे.
उच्च शिक्षण कर्ज योजना-
उच्च शिक्षण कर्ज योजना रु.८०,०००/-(ऐंशी हजार) देण्यात येईल.
गुणवत्ता प्रणाली आणि नित्य सुधारणा -
आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार आवश्यक किंवा औद्योगिक क्षेत्रात उत्तम गणली जाणारी नविन यंत्रणा आणि कार्यपद्धती यांची अंमल बजावणी करण्यासाठी,परिश्रमांसाठी संघाने आपला पूर्ण पाठिंबा आणि सहभाग जाहीर केला आहे.
आरोग्य विमा योजना -
आरोग्य विमा योजना यापुढेही चालू राहील.
फ्लोटर मेडिक्लेम पॉलिसी -
कामगारांच्या कुटुंबासाठी(स्वतः कामगार, त्याची पत्नी, आई, वडील दोन अपत्य) विमा रक्कम वार्षिक रु.२,००,०००/- असेल. या व्यतिरिक्त बफर पॉलिसी रु.१,००,०००,०००/-(एक कोटी रुपये)विमा कंपनीकडे ठेवण्याचे तसेच गंभीर आजाराच्या बाबतीत वापरण्याचे मान्य केले आहे.
विशेष फायदे -
ग्रॅच्युइटी कायद्याप्रमाणे कामगारास दिली जाईल.
स्पेशल ग्रॅच्युइटी -
दहा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ कंपनीच्या सेवेतून कामगारास कंपनी सोडल्यास किंवा सेवेतून बाहेर झाल्यास ते कामगार पाच महिन्यांचे वेतन (मुळ वेतन + महागाई भत्ता) स्पेशल ग्रॅच्युइटीस पात्र राहतील.
आजारपणाची विशेष रजा -
कर्करोग,अँजिओप्लास्टी,अर्धांगवायू,किडनी निकामी इ.गंभीर आजारासाठी वरील रजा मंजूर केल्या जातील.
अपघात झाल्यास मिळणारी सहाय्यता/सुविधा -
कंपनीत कामावर असताना अपघात झाल्यास मिळणारी रजा व इतर फायदे मिळण्यास कामगार पात्र राहतील.
अपघात कारणास्तव सात दिवसापेक्षा जास्त तीस दिवसापेक्षा कमी किंवा तीस दिवस गैरहजर राहिल्यास गैरहजर दिवसाच्या एकूण पगाराच्या ७०% इतकी रक्कम अपघाती रजेसाठी दिली जाईल.
तसेच तीस दिवसापेक्षा जास्त तीन महिन्यापर्यंत एकूण पगाराच्या ८५% एवढी रक्कम अपघाती रजेपोटी दिली जाईल.
वैद्यकीय तपासणी -
कामगारांची तसेच त्याच्या पत्नीची वेतनकराराच्या कालावधीत वैद्यकीय तपासणी केली जाईल. तसेच कामगाराची वर्षातून दोनदा कंपनीत चाचणी करण्याचे कंपनीने मान्य केले आहे.
दिर्घ सेवा पुरस्कार -
२५ वर्ष सेवा कालावधी पारितोषिक रक्कम रु.१२,०००/-देण्यात येईल.
३५ वर्ष सेवा कालावधी पारितोषिक रक्कम रु.६,०००/-देण्यात येईल.
३८ वर्ष सेवा कालावधी पारितोषिक रक्कम रु.५,०००/-देण्यात येईल.
सेवानिवृत्ती भेट -
सेवानिवृत्त होणाऱ्या कामगारांना एक महिन्याचे मूळ वेतन + महागाई भत्ता + ३५,०००/- एवढी रक्कम भेट म्हणून देण्यात येईल.
कॅन्टीन -
पूर्वीच्या सुविधेव्यतिरिक्त कॅन्टीन मध्ये भाकरी देण्यात येईल. कॅन्टीन सुविधांसाठी दरमहा रु.३८ प्रत्येकी कपात केले जाईल.
सेवा निवृत्ती वय -
कामगाराचे सेवानिवृत्ती वय ६० वर्ष असेल
कराराचा लाभ -
कराराचा लाभ म्हणून रु .८,०००/-लागू असल्यास आयकराची कपात करून देण्यात येईल. तसेच या येणाऱ्या रकमेतून रु.४०००/- इतकी रक्कम कंपनीने कापून घ्यावयाची असून ती रक्कम संघाच्या कार्यासाठी संघाकडे द्यावयाची आहे.
बोनस -
बोनस हा मिनिमम वेजेसच्या २०% अंदाजे ३०,०००/- (तीस हजार) प्रत्येक वर्षी देण्यात येईल.
मिठाई -
कामगारांसाठी दसरा सणानिमित्त १ किलो सुकामेवा मिठाई दरवर्षी देण्यात येईल.
कोरोना काळातील मार्च ते सप्टेंबर या सहा महिन्यातील वाढीव पगारवाढ घेतली जाणार नाही.
सदर वेतनवाढ करारामुळे कामगारांना कमीत कमी दरमहा रु.१४,५००/-एवढी एकरकमी आणि जास्तीत जास्त दरमहा रु.१५,६००/-एकरकमी पगारवाढ होईल. तसेच कामगाराचा कमीतकमी रु.४५,०००/- व जास्तीत जास्त रु.८०,०००/- एवढा मासिक पगार होईल. वेतनकरार फरकापोटी रु.१,६७,०००/- एवढी रक्कम देण्यात येईल. अशी माहिती कामगार संघटनेने दिली.
सदर करारामुळे कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून करून संघटनेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच हे यश मिळाल्याची भावना कामगारांनीही व्यक्त केली.