महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा शिष्यवृत्ती अर्ज भरावयाची पद्धत


महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ - सर्वसाधारण शिष्यवृत्ती अर्ज भरावयाची पद्धत :

  • प्रथमतः: www.public.mlwb.in ही वेबसाईट उघडावी.

  • Labour Login (employee login) क्लिक करा.

  • Enter LIN number (इथे कंपनीतून मिळालेला लिन नंबर टाकावा.)

  • Enter Password (इथे कंपनीत टाइप झालेला कामगाराचा मोबाइल नंबर टाकावा. कंपनीने जो मोबाईल नं टाकला होता तोच टाइप करून टाकावा.)

  • Login बटनवर क्लिक करावे.

  • Login success म्हणून कामगाराचा Dashboard उघडेल.

  • निळ्या रेषेेवरील Profile उघडावे

  • Add / update Labour Dept उघडावे.

  • नंबर 1 ला कामगाराच्या पतीचे/ पत्नीचे नाव व पुढील डिटेल्स भरावेत. व खाली कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे मुले मुली, आई वडील यांचे डिटेल्स भरावेत. (याव्यतिरिक्त इतर टाकु नये)

  • Save  बटन दाबावे.

  • Data saved successfully चा मेसेज येतो. Ok करावे.

कामगाराची सभासद वर्गणी भरणे :

  • त्याच्याच शेजारी पिवळ्या रंगाचे बटन. Create Membership दाबावे.

  • Labour/Employee  सिलेक्ट करावे.

  • LIN NUMBER टाकावा.

  • Get Details 

  • कामगाराची संपूर्ण माहिती भरावी. यामध्ये संबंधित जिल्हा, विभाग, सर्कल, केंद्र नाव घ्यावे.

  • फोटो Upload करावा, त्यानंतर आधार व पे स्लिप लावावी.

  • Submit & Pay

  • Data saved successfully इथे OK करावे.

  • Bill Desk उघडते. त्यावर क्लिक करावे.

  • Pay rs. 15.00 दिसेल, त्या खालील पेमेंट option निवडावे

  • Credit card/ debit card

  • आपला डेबीट कार्ड नंबर टाकावा Card number

  • Expiration Date जी कार्डवर असते ती टाकावी.

  • CVV/CVC (कार्ड पाठीमागे तीन आकडी नंबर असतो तो टाकावा.)

  • Card Holder नाव टाकावे.

  • Make payment for rs. 15.00 क्लिक करावे.

  • पेमेंट करिता अकाउंट मालकाला OTP त्याच्या मोबाइल वर जाईल.

  • मोबाइलवर आलेला OTP टाकावा. 

  • Payment successfull येईल. त्याबाबतचे Acknowledgement येईल.

  • Print वर क्लिक करून पावती प्रिंट करावी किंवा ती पावती save करावी. 

अशा रितीने कामगाराची सभासद वर्गणी भरता येईल.

कुटुंबिय व्यक्तीची सभासद फी भरणेकरीता :

  • Public portal वरील Membership बटन उघडावे

  • New Membership

  • Employee Family सिलेक्ट करावी.

  • LIN NUMBER टाकावा.

  • Get Details मध्ये कुटुंबातील सदस्यांची यादी दिसेल. त्यातील एकास उजवीकडील गोल बटनावरुन सिलेक्ट करावे.

  • त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती भरावी. यामध्ये संबंधित जिल्हा, विभाग, सर्कल, केंद्र नाव घ्यावे.

  • फोटो Upload करावा, त्यानंतर आधार व पे स्लिप लावावी.

  • (ज्या प्रमाणे कामगाराचे पैसे भरले गेले तसेच कुटुंबियांचे देखील भरावेत.) असे प्रत्येक family member करिता करावे. व सर्वांची membership करावी. 

  • Membership,  म्हणजे सभासद वर्गणी जमा झाली व ती त्या केंद्रातुन कन्फर्म झाली की, तसा मेसेज आपल्या मोबाइलवर येतो.

यानंतर शिष्यवृत्ती अर्जाकरिता प्रोसेस :

  • Public portal

  • Membership

  • Application For Scheme

  • Schemes ची यादी उघडते त्यातील अनु. क्र ११ वरील सर्वसाधारण शिष्यवृत्ती मधील

  • Apply Now या निळ्या बटनवर क्लिक करावे.

  • LIN NO.कामगाराचा लिन नंबर टाकावा

  • Submit करावे.

  • कुटुंबियांची नावांची यादी उघडेल. त्यातील अर्जदाराचे नाव निवडावे Select बटन वरुन.

  • Save & next

शिष्यवृत्ती अर्ज उघडेल. तो संपूर्ण. व्यवस्थित भरण्यासाठी :

  • केंद्र निवडा.

  • Income Slab (वडिलांच्या उत्पन्न प्रमाणपत्रानुसारच टाकावा. अन्यथा अर्ज बाद होऊ शकतो.) 

  • इतर योग्य ती कागदपत्रे ओरिजनल ची इमेज अपलोड करावी. (जिथे एकपेक्षा अधिक कागद लावायचे आहेत तिथे त्यांना एकत्रित पिडिएफ करावे. मगच अपलोड करावे.) अस्पष्ट कागदपत्रे देऊ नये.

  • शेवटी मोबाइलवर OTP जाईल. तो टाकावा.

  • परत एकदा अर्ज तपासून घ्यावा.

  • Final Submit करावे.

  • अर्ज प्रिंट करुन घ्यावा.

अर्ज ऑनलाईन स्वीकारण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२१ आहे.


या पद्धतीने शिष्यवृत्ती करिता अर्ज करता येईल फॉर्म भरताना काही शंका / समस्या असेल तर तुमच्या भागातील कामगार कल्याण केंद्र प्रमुख / अधिकारी यांनी संपर्क करा.


संबंधित पोस्ट :

कामगार कल्याण मंडळाचे सर्वसाधारण शिष्यवृत्ती योजनेकरिता ऑनलाईन अर्ज सुरु