कामगार कल्याण मंडळाचे सर्वसाधारण शिष्यवृत्ती योजनेकरिता ऑनलाईन अर्ज सुरु

ज्या कामगारांना LIN नंबर मिळाला आहे व ते त्याभागातील कामगार कल्याण मंडळ केंद्राचे सभासद झाले आहेत अशा कामगार व कामगार कुटुंबीयांकरिता सर्वसाधारण शिष्यवृत्ती योजनेचे ऑन लाईन अर्ज भरण्या करिता महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची वेबसाइट सुरु झालेली आहे.

     https://public.mlwb.in या संकेत स्थळवर जाऊन membership वरती क्लिक करून Application for schemes मध्ये सर्वसाधारण शिष्यवृती योजनेचा अर्ज भरता येईल. वेबसाट ओपन झाल्यावर संबंधित कामगारांचा LIN नंबर हा यूजर नेम राहील व रजिस्टर मोबाइल नंबर पासवर्ड राहणार आहे. 

अर्ज ऑनलाईन स्वीकारण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२१ आहे.

सर्वसाधारण शिष्यवृत्ती योजनेचे स्वरुप - 

१)  महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ च्या कक्षेत येणारे कामगार पाल्य सदर योजनेसाठी पात्र आहेत.

२)  इयत्ता नववी पास झाल्यानंतर इयत्ता दहावी पासून पुढील सर्व शिक्षणासाठी सदर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येतो.

३)  विद्यार्थ्यास मागील शैक्षणिक वर्षात किमान ६० टक्के गुण असावेत.

४)  इयत्ता दहावी, अकरावी, बारावी, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, इतर शासन मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रम, पीएचडीसाठी नोंदणी झालेले विद्यार्थी, तसेच यूपीएससी व एमपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी सदर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

५)  दिव्यांग विद्यार्थ्यांना अर्ज करताना टक्केवारी व पालकांच्या उत्पन्न मर्यादेत बंधन नाही.

६)  विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडला असल्यास विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र सह अर्ज करता येईल.

७)  प्राप्त अर्ज गुणवत्तेनुसार (मेरिट) व मंडळाच्या आर्थिक तरतुदीच्या अधिन राहून मंजूर / नामंजूर केले जातील.

८)  मुक्त विद्यापीठाचे बहिस्थ व दूरस्थ शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच अप्रेंटिसशिप इंटर्नशिप किंवा  शिक्षण घेताना मानधन, मोबदला,मेहनताना घेणारे विद्यार्थी सदर योजनेसाठी अपात्र असतील.

 ९)  मंजूर शिष्यवृत्तीची रक्कम पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल.

 १०) जून मध्ये साखर कारखाने बंद असतात. अशावेळी हंगामी कामगारांची मागील डिसेंबर ची पावती ग्राह्य असेल.त्यात महाराष्ट्र कामगार कल्याण निधी रु.१२/- कपात  नोंद असावी.

सूचना : 

संकेतस्थळावर अपलोड करावयाची सर्व कागदपत्रे मूळ (ओरिजनल) असावीत. छायांकित प्रती (झेरॉक्स) अपलोड करू नयेत.

आवश्यक कागदपत्रे : 

१)  गत वर्षाची गुणपत्रिका (सत्र पद्धती असल्यास दोन्ही) किमान ६०% गुण आवश्यक. 

२)  चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र.विद्यार्थ्यांचे आधार कार्ड. बँकेचा कॅन्सल चेक किंवा बँक पासबुक (अकाउंट नंबर व आय.एफ.एस.सी. नंबर नमूद असणे आवश्यक)

३)  महाराष्ट्र कामगार कल्याण निधी (MLWF) कपात दर्शवणारी पगार पावती किंवा वेतन पावती नसल्यास कामगाराचा MLWF भरणा केल्याबाबतचा अस्थापणेचा दाखला

४)  कंपनी बंद पडली असल्यास कंपनी बंद पडल्या बाबतचा सक्षम प्राधिकरणाचा दाखला किंवा कामगाराचा सेवेत असताना मृत्यु झालेल्या मृत्यूचा दाखला जोडावा. सदर दाखले कंपनी बंद पडल्यापासून ३ वर्षापर्यंत वैध असून मंडळाच्या योजनांचा लाभ मिळू शकतो. (लागू असल्यास) 

५)  कामगाराचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला (फॉर्म १६ किंवा आस्थापना दाखला) रेशनकार्ड / ईएसआयसी कार्ड (कोणतेही एक)अर्जदार दिव्यांग असल्यास सक्षम प्राधिकरणाचा दाखला जोडावा.

योजना विषयी अधिक माहिती साठी आपल्या भागातील कामगार कल्याण केंद्र येथे संपर्क करावा.