महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटना पुणे जिल्हाच्या वतीने तीळगुळ वाटप समारंभाचे आयोजन श्री.समर्थ सेवा मंडळ ट्रस्ट हॉल, शनिवार पेठ, पुणे ३० येथे करण्यात आले. समारंभा करीता मा.श्री.दत्तात्रय तथा भगवानराव देशपांडे अध्यक्ष श्री.समर्थ मंडळ,मा.श्री.सतिश प्रभाकर चिटणीस विश्वस्त श्री.समर्थ मंडळ, मा.श्री.राजू परदेशी स्वीकृत सदस्य पुणे मनपा, मा.श्री.अमित कंक अध्यक्ष भा.ज.पा.यूवा मोर्चा ,मीना पंडीत, स्मिता कोरडे, सुवर्णा कोंढाळकर प्रदेश पधाधिकारी, उषा जाधव अध्यक्ष पुणे जिल्हा व्यासपिठावर उपस्थित होते.
प्रभू भगवान विश्वकर्मा प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. सुनिता बढे,शिला आटपाळकर यांनी श्रमिक गीत म्हटले.उपस्थित मान्यवरांचा परिचय व स्वागत करण्यात आले. मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. दत्तात्रय तथा भगवानराव देशपांडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संघटनेच्या कामाचे कौतुक केले आपण सर्व कार्यकर्ते असंघटीतांना संघटीत करुन त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम करीत असल्याबद्दल समाधान व्यक्त करुन पुढील काळात समर्थ मंडळ संघटनेला सर्वतोपरी सहकार्य करेल असे सांगितले.
प्रदेश सरचिटणीस श्री.शरद पंडीत यानी प्रास्ताविका मध्ये संघटनेच्या कामाची रूपरेषा स्पष्ट केली, यानंतर उपस्थित महिलांना तीळगुळ व वानाचे वाटप करण्यात आले.