महाराष्ट्रातील मोबाईल सेवा विस्कळीत होण्याच्या मार्गावर…. संघटनेने दिला अंदोलनाचा इशारा

कोरोना महामारी व लॉकडाऊनचा काळामध्ये  राज्यातील इतर सर्व इंडस्ट्रीज बंद असताना, नागरिकांना अति महत्त्वाचा सुविधा पुरवण्याचे एकमेव साधन असलेल्या मोबाईलच्या वाढलेल्या वापरामुळे सर्व मोबाईल कंपन्याचा फायदा होऊन त्यांना भरभराटीचे दिवस आलेले आहेत. परतुं हि सेवा पुरवण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या कामगारांना मात्र या कंपन्यानी त्याचावर केलेल्या मनमानी कारभारामुळे अन्याय सहन करण्याची वेळ आलेली आहे. 

   गेल्या १५ ते २० वर्षापासुन आयडिया - वोडाफोन, ए.टी.सी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.ली. कंपनी मध्ये राज्यातील १००० ते १५०० कामगार केअरटेकर ( सिक्युरिटी गार्ड )  या पदावर मोबाईल टाँवरची सुरक्षा व आँपरेटिगचे काम करत आहेत. या कंपनीने कोरोना महामारी लाँकडाऊन व त्या आधीच्या परस्थितीचा फायदा घेऊन ५०० ते ७०० कामगाराचा पगार अचानक बंद करून त्यांना कामावरून कमी केले आहे. व उर्वरित कामगारांकडून कोरोनाच्या  काळामध्ये काम करून घेऊन त्यांना नोकरीवरून काढण्याची प्रक्रिया चालवली आहे. कंपनीने नोकरीवरून काढलेल्या कामगाराना गुंड प्रवृत्तीच्या कॉन्ट्रकटर मार्फत दडपशाही करून राजीनामे लिहुन घेतलेले आहेत. काहीना तुम्ही मोबाईल टाँवर बंद पाडले असे सांगुन चोरीच्या खोटया गुन्हयामध्ये अडकवण्याची धमकी देऊन आपल्या साईट सोडण्यास परावृत्त केलेले आहे. कंपनीने त्याचा आजपर्यतचा पीएफ भरलेला नसुन नियमा प्रमाणे ग्रॅज्युइटी न देता त्यांना कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई दिलेली नाही. कंपनी व्यवस्थापणाने या कामगाराच्या नोकरी बाबत घेतलेल्या निर्णयामध्ये कामगार कायद्यातील कुठल्याही तरतुदींचे व नियमांचे पालन केलेले नाही.                                                       

    मोबाईल टाँवरच्या साईट व त्या परिसरामध्ये कामगार आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत. कोरोना महामारीचा काळामध्ये अचानक नोकरी गेल्यामुळे त्यांना उपजीविकेचे दुसरे कुठलेही साधन उरले नसल्यामुळे आपल्या कुटुंबासह इतरत्र स्थालंतरीत होऊन मुलांचे शिक्षण व आपले पुढील आयुष्य कसे जगावे असा प्रश्न त्यांच्या समोर पडलेला आहे. आपले शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हे सर्व कामगार कंपनी मध्ये रुजू झालेले आहेत. अर्ध्यावर नोकरी गेल्यामुळे त्यांना या वयात इतर कंपनी मध्ये नोकरी मिळणे कठीण झालेले आहे. कंपनी व्यवस्थापणाने घेतलेल्या आडमुठेपणाच्या भूमिकेमुळे कामगार तणावाखाली जीवन जगत असून त्यांची मानसिक स्थिती ढासळलेली आहे.                     

    संबंधित कंपन्यांनी १५ दिवसाच्या आतमध्ये संघटनेशी चर्चा करून कामगांराना कामावरून काढल्यापासून आज पर्यंतचा पगार देऊन त्यांना पूर्ववत कामावर घ्यावे व सध्या कामावर असलेल्या कामगारांना कामावरून काढुन टाकण्याची प्रक्रिया त्वरित थांबवावी नाहीतर नाईलजस्त्व संघटनेला कामगारावर झालेल्या अन्यायावर आवज उठवून त्यांना न्याय मिळून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये तीव्र आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय रहाणार नाही. व या आंदोलनामुळे उद्भवलेल्या सर्व परस्थितीची  जबाबदारी संबधीत कंपन्यावर राहील याची त्यांनी दखल घ्यावी असे महाराष्ट्र राज्य मोबाईल टॅावर टेक्नीकल एम्प्लोयीज असोसिएशन वतीने सांगण्यात आले.

महाराष्ट्र राज्य मोबाईल टॅावर टेक्नीकल एम्प्लोयीज असोसिएशन या राज्यातील टेलीकाँम क्षेत्रातील पहिल्या संघटनेची स्थापना झालेली आहे. संघटनेचे कार्यालय अहमदनगर या ठिकाणी आहे. संघटनेचे आजपर्यत २ ते ३ हजार सभासद झालेले आहेत. कामगारांची पगारवाढ व इतर कायदेशीर मागण्याचे संघटनेने अनेक यशस्वी करार केलेले आहेत. रिजनल लेबर कमिशनर (सेंन्ट्रल) मुंबई, पुणे, नागपुर व इन्डस्ट्रीअल कोर्टामध्ये सघंटने मार्फत कामगांराच्या कायदेशीर मागण्याचे दावे सुरु आहेत.

कंपनीने नोकरी वरून काढलेल्या व सध्या कामावर असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील सर्व  केअरटेकर ( सिक्युरीटीगार्ड ) कामगारांनी आपल्या  न्याय हक्कासाठी आंदोलनात सहभागी व्हावे. व आपली माहिती संघटनेला दयावी अशी माहिती असोसिएशन अध्यक्ष सदाशिव खेडकर यांनी दिली. दूरध्वनी क्रमांक - ०२४१२४२३६७८, ७७७४०१७७१३, ७७७४०१७७१०.