केंद्र सरकरने ४ कामगार संहिताना दिले अंतिम स्वरूप, लवकरच अंमलात ?

Labour Ministry finalises Four Labor codes, reform to be a reality soon

नवी दिल्ली: कामगार व रोजगार मंत्रालयाने चार कामगार संहिता अंतर्गत नियमांना अंतिम केले असून यामुळे कामगार सुधारणांच्या (Labour Code) अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर चार संहितांनुसार वेतन, इंडस्ट्रीयल रिलेशंस, सामाजिक सुरक्षा आणि ऑक्यूपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडीशन (OSH) यांना सूचित केले गेले आहे. लवकरच या नियमांना अंमलबजावणीसाठी सूचित केले जाईल. 

कामगार सचिव अपूर्व चंद्र म्हणाले की,'चार कामगार संहितांच्या अंमलबजावणीसाठी कामगार नियमांना अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. चार संहितांनुसार नियम बनविण्यासाठी राज्ये आपले काम करीत आहेत. संसदेने वेतन, इंडस्ट्रीयल रिलेशंस, सामाजिक सुरक्षा आणि ऑक्यूपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडीशन (OSH) या चार मुख्य संहिता पारित केल्या ज्या मध्ये ४४ केंद्रीय कामगार कायद्यांची पुनर्रचना करण्यात आली. वेतन कोड २०१९ मध्ये संसदेने मंजूर केला होता, तर अन्य तीन संहिता २०२० मध्ये दोन्ही सभागृहातून मंजूर करण्यात आल्या.

केंद्र सरकारला एकाच वेळी सर्व चारही कोडांची अंमलबजावणी करायची आहे. नियम तयार केल्यानंतर, आता एकाच वेळी चार कोड सूचित केले जाऊ शकतात.

यापूर्वी ८ फेब्रुवारी २०२१ रोजी अपूर्व चंद्राने पत्रकार परिषदेत म्हटले होते की, “नियम तयार करण्याची प्रक्रिया आधीच सुरू आहे आणि येत्या आठवड्यात ती पूर्ण होण्याची शक्यता आहे. नियम तयार करताना सर्व भागधारकांचा सल्ला घेतला जातो. हे मंत्रालय लवकरच चार कोड लागू करण्याच्या स्थितीत असेल."