भोकरदन : समग्र शिक्षा अभियान अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या कस्तुरबा गांधी निवासी बालिका विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी गेल्या १५ वर्षापासुन कंत्राटी तत्वावर काम करत आहे त्यांना न्याय मिळून देण्यासाठी व सेवेत कायम करण्यासाठी व सेवा संरक्षण मिळून देण्यासाठी प्रहार संघटना काम करणारआहे. त्यासाठी शनिवार ता.१३ रोजी प्रहार संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख श्री संतोष राजगुरू, सचिन दांडगे लिपिकवर्गीय जिल्हा अध्यक्ष प्रहार संघटना जालना यांच्या उपस्थितीत जालना जिल्हा शिक्षक पतसंस्था जालना येथे मिटिंग पार पडली. यावेळी मराठवाडातील कर्मचारी उपस्थिती होते.
राजगुरू यांनी मार्गदर्शन केले कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील सर्वच कर्मचाऱ्याचे काम १००% करण्याचा प्रयत्न प्रहार संघटने मार्फत करण्यात येणार आहे. मा .बच्चू भाऊ कडू राज्य शिक्षणमंत्री यांच्या माध्यमातुन मंत्रालय स्तरावर लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.
या वेळी प्रहार संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख संतोष राजगुरू, जिल्हा अध्यक्ष प्रहार संघटना बी.आर . काळे, लिपिकवर्गीय संघटना जिल्हा अध्यक्ष सचिन दांडगे, तालुका अध्यक्ष जालना मुंकुद खरात, कस्तुरबा गांधी विद्यालय संघटना अध्यक्ष एम .लहाणे, एन .डी . बोर्डे , पि.आर जोगदंडे, व्ही.डी भानुसे , सातपुते, अन्सारी व इतर कर्मचारी उपस्थित होते सुत्र संचालन सातपुते सरांनी केले तर आभार प्रदर्शन मडके सरांनी मांडले प्रास्ताविक अन्सारी मॅडम यांनी केले व मार्गदर्शन लहाने सर यांनी केले.