मुंबई : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेश शिक्षण शिष्यवृत्ती, क्रीडा शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य योजना यांचे ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक २५ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून पूर्वी हि मुदत १५ फेब्रुवारी पर्यंत होती. या संदर्भात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने परिपत्रक प्रसिद्ध केले.
अर्ज सादर करण्याची पद्धत :
कामगार स्वतःसाठी आपल्या पाल्यासाठी असलेल्या आर्थिक लाभाच्या योजना आपल्या घरी बसुन मोबाईलवर मंडळाने लाँच केलेल्या 'महाकल्याण' या ॲपवर घेऊ शकतो तसेच https://public.mlwb.in या संकेत स्थळावर जाऊनही कामगार किंवा कामगार पाल्य मंडळाच्या विविध योजनांसाठी आपला अर्ज सादर करु शकतो यासाठी मंडळाकडून प्रत्येक कामगांरास दिलेला लिन नंबर हा यूजर नेम म्हणून तर कंपनीकडे त्याने रजिस्टर केलेला मोबाईल नंबर हा पासवर्ड म्हणून वापरावा लागेल.
योजना लाभ कोण घेऊ शकतो :
विविध कंपनीमधील / आस्थापनांमधील कामगार जे मंडळाचा कामगार कल्याण निधी रु १२ हा फंड दर जून व डिसेंबर या महिन्यात पगारातून भरणा करतात त्याचबरोबर ज्या कामगारांना LIN नंबर मिळाला आहे व ते त्याभागातील कामगार कल्याण मंडळ केंद्राचे सभासद झाले आहेत अशा कामगार व कामगार कुटुंबीय विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊ शकतात.
फॉर्म भरताना काही शंका / समस्या असेल तर तुमच्या भागातील कामगार कल्याण केंद्र प्रमुख / अधिकारी यांनी संपर्क करा.
अर्ज अंतिम दिनांक मुदतवाढ परिपत्रक -