मुंबई : राज्यातील कामगारांना अतिविशिष्ट वैद्यकीय उपचारांसह आधुनिक वैद्यकीय सुविधा महाराष्ट्र राज्य कर्मचारी विमा योजनेअंतर्गत देण्यात येते. या योजनेअंतर्गत सर्व जिल्हे समाविष्ट करण्यासाठी विभागाने प्रयत्न करावा, अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या.
राज्य कामगार विमा योजनेची सुविधा शासकीय रुग्णालयासाठी संलग्न करण्यासंदर्भातील बैठक आज वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह महाराष्ट्र राज्य कर्मचारी विमा योजनेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, महाराष्ट्र राज्य कर्मचारी विमा योजना सोसायटी आणि केंद्र शासनाची कर्मचारी विमा योजना याबाबत संयुक्त बैठक लावून कामगारांना अधिकाधिक फायदा कसा मिळेल याबाबत लक्ष देण्यात यावे.