काँग्रेस व कामगार कर्मचारी संघर्ष युनियन व्यापक बैठकीत इशारा
कोहापूर : काँग्रेस व कामगार कर्मचारी संघर्ष रिक्षा युनियन यांच्यावतीने जिल्हास्तरीय व्यापक बैठक राजारामपुरी येथे जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस प्रदेश सचिव व कामगार संघर्ष युनियन प्रदेशाध्यक्ष संजय पाटील हे होते. यावेळी ते म्हणाले रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणे, पूर्वीप्रमाणे तीन जिल्हा परवाना मिळावा तसेच विविध मागण्या कालावधीमध्ये न सोडवल्यास जिल्हाधिकारी कार्यालयास शेकडो रिक्षांचा घेराव घालून जनआंदोलन छेडणार असल्याबाबत सांगितले.
विविध मागण्या :
- रिक्षा चालकांना इतर मंडळांमध्ये समाविष्ट केले आहे तसे न करता स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे तरच राज्यातील लाखो रिक्षाचालकांना थेट लाभ मिळेल. कल्याणकारी मंडळाने विविध योजना लाभल्या तर त्याचा लाभ रिक्षाचालक व त्यांच्या कुटुंबियांना मिळेल.
- पालक मंत्री व जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक महिन्याला एक दिवस रिक्षाचालकांच्या समस्या निराकरण करण्यासाठी एक बैठक आयोजित करावी.
- पूर्वी रिक्षाचालकांना तीन जिल्ह्यांचा परवाना होता पण तो रद्द केलेला असून स्थानिक पातळीवर परवानगी दिलेली असून हे अन्याय कारक आहे यामुळे रिक्षाचालकांच्या रोजीरोटीचा प्रश्न उग्र बनला आहे त्यामुळे पूर्वीप्रमाणे तीन जिल्ह्यांचा परवाना मिळावा.
- विद्यार्थी वाहतूक १० विद्यार्थ्यांचा परवाना मिळावा.
वरील मागण्या विहित कालावधी मध्ये मान्य नाही झाल्यास काँग्रेस पक्ष शेकडो रिक्षाचालकांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालून जनआंदोलन करणार असा इशारा बैठकीत देण्यात आला.
या बैठकीसाठी कोल्हापूर इचलकरंजी शहरातील रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीस जिल्हाध्यक्ष अमित पाटील, अनिल कावाळे, योगेश हातलगे, रियाज जैनापुरे, विनोद किर्तकर, अर्जुन बुचडे, गजानन बुडके, मल्लिकार्जुन बिळूर (स्वामी), संजय येलाज, जितेंद्र शिंदे, अमर कांबळे, सुभाष मशाळकर, बाळू कात्रे, अनिल केर्ले, दिलीप गाताडे, संजय कुरणे, रावसाहेब घुणके, राजू शेळके, अशोक नांद्रे, पांडूरंग पाटील, अर्जुन मोरे, सुनिल जाधव इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.